Success story : अलीकडच्या काळात अनेक तरुण व्यवसायाकडे वळत असल्याचं चित्र दिसत आहे. तर काही तरुण चांगली नोकरी (Job) सोडून व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. या तरुणाने लाखो रुपयांची नोकरी सोडून इडली विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. कृष्णन महादेवन (Krishnan Mahadevan) असं या तरुणाचं नाव आहे. आज या व्यवसायातून ते लाखो रुपये कमावत आहेत. 


यशासाठी कठोर परिश्रम करणं आवश्यक आहे. आज आपण लाखो रुपयांची नोकरी सोडून व्यवसाय करणाऱ्या कृष्णन महादेवन यांची यशोगाथा पाहणार आहोत. कृष्णन महादेवन हे जगातील सर्वात प्रसिद्ध, सर्वात मोठ्या आणि जुन्या गुंतवणूक बँकिंग फर्मपैकी एक असलेल्या गोल्डमन सॅक्समध्ये लाखो रुपयांच्या नोकरीवर काम करत होते. पण त्यांनी ती नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. 


2001 मध्ये सुरु केले होते दुकान 


कृष्णन यांचे वडील महादेवन यांनी 2001 मध्ये बंगळुरुच्या विज्ञान नगरमध्ये अय्यर इडली नावानं इडली बनवण्याचे दुकान सुरू केले आहे. पूर्वी ते घरी इडली आणि डोसा पीठ बनवायचा आणि जवळच्या दुकानात विकायचा. पण काही लोकांनी त्यांना इडली बनवून विकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी अय्यर इडली नावाचे दुकान सुरू केले. जे अल्पावधीतच गरमागरम इडल्या विकण्यासाठी प्रसिद्ध झाले. त्याच्या इडलीची चव सर्व वयोगटातील लोकांना आवडली. अय्यर इडली बंगळुरूमधील इडलीप्रेमींसाठी प्रसिद्ध आहे. 


2009 मध्ये, जेव्हा कृष्णनचे वडील महादेवन यांचे निधन झाले. त्यानंतर 'अय्यर इडली दुकान' चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि आईसोबत व्यवसाय हाती घेतला.अय्यर इडली फ्लफी आणि खास मऊ इडलीसाठी प्रसिद्ध आहे. दर महिन्याला 50,000 हून अधिक इडल्या विकून ते भरपूर पैसे कमावतात. ते 20 फूट बाय 10 फूट आऊटलेट्सच्या माध्यमातून मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटशी स्पर्धा करत आहेत.


मेनूमध्ये नवीन पदार्थ


कृष्णन यांचे दुकान अत्यंत साधे आहे. ते दुकानाच्या फॅन्सी इंटीरियरकडे लक्ष देत नाहीत. ते फक्त इडलीची गुणवत्ता, स्वच्छता आणि चव यावर लक्ष केंद्रित करतात. अनेक वर्षे फक्त इडल्या विकल्यानंतर त्यांनी आता त्यांचा मेनू वाढवला आहे. ज्यामध्ये केसरी भात, खरा भात, वडा या नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्या:


सहावी पास ते 279 कोटींची संपत्ती, 76 वर्षांचे'काका' जाणार देशाच्या सर्वोच्च सभागृहात