Wipro Offer Letter: जगावर सध्या मंदीचं सावट घोंगावतंय त्यामुळे अनेक बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरु आहे. दरम्यान बंगळुरुतील आयटी क्षेत्रातील नामांकीत कंपनी विप्रोने (Wipro) एक वेगळाच निर्णय घेतला आहे. नवीन उमेदवारांना (Freshers) कमी पगारात काम करणार का? अशी विचारणा करण्यात आली आहे. याबाबत कंपनीने त्यांना एक मेल पाठवला आहे. त्यात त्यांनी वार्षिक साडेतीन लाख रुपयांमध्ये काम करु शकता अशी विचारणा केली आहे. कंपनीच्या या मेलमुळे इच्छुक उमेदवार गोंधळून गेले असून त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी कंपनी नवीन उमेदवारांना साडेसहा लाख रुपये वार्षिक पगार देत होती.
बिजनेस स्टँडर्डने दिलेल्या माहितीनुसार, Wipro कंपनीने आपल्या नव्या कर्मचाऱ्यांना एक मेल केला आहे. कंपनीतील नव्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 6.5 (LPA -Lakhs Per Annum) लाख रूपये आहे ते सध्या ऑन रोल जाण्याच्या प्रतीक्षेत आहे त्या कर्मचाऱ्यांना हा ईमेल पाठवण्यात आला आहे. या ईमेल मध्ये कर्मचाऱ्यांना थेट 3.5 लाख सॅलरीवर रुजू होण्याची तयारी आहे का? असा सवाल केला आहे. विप्रोच्या 2022 च्या ग्रॅज्युएट बॅचमधील कर्मचारी ऑनरोल जाण्याच्या प्रतीक्षेत अनेक महिन्यांपासून आहे. परंतु कंपनीकडून आलेल्या मेलनंतर कर्मचारी गोंधळले आहे. सध्या असणाऱ्या सॅलरीच्या (Salary) अर्ध्या सॅलरीवर त्यांना जॉब ऑफर (Job Offer) केला आहे.त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण झाले आहे
कंपनीच्या ईमेलमध्ये काय लिहिले?
कंपनीने उमेदवारांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, आमच्याकडे प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer) पदासाठी जागा खाली आहेत. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना ही संधी देऊ इच्छित आहे. जर कोणी इच्छुक असेल तर त्यांना मार्च 2023 पासून ऑनबोर्ड घेण्यात येईल. या अगोदरच्या सर्व ऑफर बरखास्त करण्यात आलेल्या आहेत.
कंपनीची बाजू
या ईमेलनंतर (Email) कंपनीची बाजू समोर आली आहे. कंपनीने म्हटले आहे की, आम्ही या ऑफरचा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी प्रोत्साहन दिले आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला ही ऑफर मंजूर नसेल तर ते कर्मचारी त्यांच्या ओरिजनील ऑफरवर कायम राहू शकतात.
कंपनीच्या या मेलमुळे इच्छुक उमेदवार गोंधळून गेले असून त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर मेलनंतर कर्मचारी गोंधळले आहे. सध्या असणाऱ्या सॅलरीच्या अर्ध्या सॅलरीवर त्यांना जॉब ऑफर केला आहे.