Anjali Merchant Majithia : अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या विवाह सोहळ्यासाठी भारतातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. राजकीय, सिनेसृष्टी तसेच अन्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती या विवाहाला उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या विवाह सोहळ्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी अंबानी कुंटुंबानेही मोठी मेहनत घेतल्याचं दिसतंय. दरम्यान, अनंत आणि राधिका यांच्या विवाहापूर्वी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत राधिका मर्चंटसोबत तिची मोठी बहीण अंजली मर्चंट दिसत आहेत त्यामुळे अंजली मर्चंट नेमकं काय करतात? त्या कुठे असतात? असे विचारले जात आहे.
अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा 12 जुलै रोजी विवाह होणार आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील (Bandra Kula Complex) जिओ वर्ल्ड कंन्व्हेंशन सेंटरमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. विवाहापूर्वीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत राधिका मर्चंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच राधिक मार्चंट यांची मोठी भहीण अंजली मर्चंट यांचीही चर्चा होत आहे.
अंजली मर्चंट कोण आहेत?
अंजली मर्चंट यांचा अमन मजिठीया यांच्याशी 2020 साली विवाह झालेला आहे. अमन मजिठीया हे प्रसिद्ध उद्योजक आहेत. अंजली मर्चंट यांचा जन्म 1989 साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण गुजरातच्या कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी इकोल मॉडलिंग स्कुलमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. तर लंडन स्कुल ऑफ बिझनेस येथून त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. अंजली मर्चंट या राधिका मर्चंटपेक्षा सहा वर्षांनी मोठ्या आहेत.
वडिलांसोबत सांभाळतात उद्योग
अंजली मर्चंट यांनी आपल्या करिअरला 2006 सालापासून सुरुवात केली. त्यांनी 2006 साली जाहिरात क्षेत्रात काही काळासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. त्यानंतर 2012 साली त्यांनी वडील वीरेन मर्चंट यांच्यासोबत घरातील उद्योग सांभाळायचे ठरवले. 2018 साली अंजली Dryfix या हेअर स्टायलिंग कंपनींच्या सहसंस्थापक झाल्या. बॉलिवूड जगतातील अनेक दिग्गजांच्या हेअर स्टायलिंगचे काम या कंपनीकडून केले जाते. 2021 साली अंजली यांनी आपल्या वडिलांच्या एनकॉर हेल्थकेअर आणि माइलॉन मेटल्स या कंपन्यांचे संचालकपद सांभाळले. अंजली मर्चंट यांचे पती अमन मजिठीया हे करोडपती आहेत.
हेही वाचा :