CIBIl Score : बँकेत कर्ज घ्यायला जाताना आपल्याला पहिल्यांदा सीबील स्कोर विचारला जातो, त्या आधारेच आपल्याल्या बँका कर्ज देतात. त्यामुळे आपला सीबील स्कोर चांगला असला पाहिजे. पण सीबील स्कोर म्हणजे नेमकं काय आणि तो कसा तपासायचा हे आपण पाहुयात.
CIBIL कसं काम करतं?
CIBIL ला भारतीय रिझर्व्ह बँकेने परवाना दिलेला आहे आणि 2005 च्या क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज कायद्याप्रमाणे त्याचं काम चालतं. हे व्यक्ती आणि कंपन्यांसाठी क्रेडिट स्कोअर, क्रेडिट रँक आणि क्रेडिट अहवाल तयार करते. कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या नवीन कर्जांसाठी अर्ज मंजूर करण्यात हा अहवाल महत्त्वाची भूमिका बजावतो.
बँका आणि इतर वित्तसंस्था जसे की NBFC त्यांच्या ग्राहकांचा डेटा, थकित कर्जाची रक्कम, परतफेड नोंदी, नवीन कर्ज, क्रेडिट कार्डसाठी अर्ज आणि इतर क्रेडिट संबंधित माहिती CIBIL ला सबमिट करतात. TransUnion CIBIL डेटाचे मूल्यांकन करते आणि क्रेडिट अहवाल तयार करते.
बँका किंवा NBFC CIBIL अहवालाच्या आधारे अर्जदाराला कर्ज देण्याच्या जोखमीचे मूल्यांकन करतात आणि नंतर कर्ज, क्रेडिट कार्ड अर्ज मंजूर करतात किंवा नाकारतात. त्यानंतर हा निर्णय CIBIL ला देखील कळविला जातो आणि ही माहिती भविष्यातील अहवालांमध्ये समाविष्ट केली जाते.
CIBIL स्कोर काय आहे?
CIBIL स्कोर ही तीन अंकी संख्या आहे. तो 300 ते 900 पर्यंत असते आणि एखाद्या व्यक्तीची कर्ज घेण्याची क्षमता दर्शवते. जेव्हा कोणी नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताक तेव्हा कर्ज देणारी संस्था अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासते आणि त्याला कर्ज देण्याच्या जोखमीचे मूल्यांकन करते. चांगला क्रेडिट स्कोअर राखणे, म्हणजे 900 च्या जास्तीत जास्त जवळ जाणारी संख्या असेल तर नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्ड अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.
CIBIL स्कोअर कसा तपासायचा? (How To Check CIBIl Score)
तुमचा CIBIL स्कोर तपासण्यासाठी www.cibil.com या वेबसाईटला भेट द्या.
यानंतर तुम्ही होम पेजवर Get Your Free CIBIL Score पर्यायावर क्लिक करा.
आता तुमचं नाव, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आयडी प्रूफ निवडावा लागेल आणि त्यानंतर तुमचा पिन कोड, जन्मतारीख आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल.
ही सर्व माहिती भरल्यानंतर Accept आणि Continue पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो प्रविष्ट करा.
OTP टाकल्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल.
यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर जावं लागेल. येथे तुम्हाला CIBIL स्कोर दिसेल, त्यासोबत तुम्ही तुमच्या नावावर किती कर्जे किंवा क्रेडिट कार्ड आहेत हे देखील तपासू शकता.
ही बातमी वाचा: