Weddings in India : दरवर्षी देशात मोठ्या प्रमाणात लग्न होतात. लग्नासाठी (Wedding) दरवर्षी भारतात (India) कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो. देशातील प्रत्येक कुटुंब एका लग्नावर सरासरी 12 लाख रुपयांचा खर्च करत आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्म जेफरीजच्या अहवालात (Jefferies Report) याबाबतची माहिती देण्यात आली आहे. भारतीय वेडिंग इंडस्ट्री आता 130 अब्ज डॉलर्सची बाजारपेठ बनली आहे. भविष्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

  


इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्म जेफरीजच्या अहवालानुसार (investment banking firm Jefferies), भारतीय विवाह उद्योग अमेरिकेच्या दुप्पट आहे. जेफरीजचा अंदाज आहे की भारतात लग्नासाठी सरासरी खर्च 14,500 डॉलर किंवा 12 लाख आहे. भारतात दरडोई उत्पन्नाच्या 5 पट लग्नावर खर्च होत आहे. एक भारतीय जोडपे लग्नावर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च करत आहे. दुसरीकडे, अमेरिकेत लग्नांवर होणारा खर्च हा शिक्षणावरील खर्चाच्या निम्मा आहे. 


देशात दरवर्षी 1 कोटी विवाह 


भारतातील कुटुंबांचे सरासरी उत्पन्न वार्षिक 4 लाख रुपये आहे. असे असूनही तो आपल्या सरासरी उत्पन्नाच्या तिप्पट खर्च विवाहसोहळ्यांवर करत आहे. अहवालानुसार, भारतात दरवर्षी 80 लाख ते एक कोटी विवाह होतात. हा आकडा संपूर्ण जगात सर्वाधिक आहे. विवाह सोहळ्यांमुळे दागिने, कपडे, इव्हेंट मॅनेजमेंट, कॅटरिंग आणि मनोरंजन यांसारखे व्यवसायही भरभराटीला येत आहेत. भारतात होणाऱ्या लग्झरी विवाहसोहळ्यांवर होणारा खर्च सरासरीपेक्षा कितीतरी जास्त आहे.


सोने चांदीच्या खरेदी विक्रीतून मोठा महसूल 


या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतात आजकाल लग्नाआधीच्या भव्य कार्यक्रम आणि समुद्रपर्यटन इत्यादींवर पैसे खर्च केले जात आहेत. ज्वेलरी उद्योगाचा निम्म्याहून अधिक महसूल वधूच्या दागिन्यांच्या विक्रीतून येतो. लग्नसाईच्या हंगामात मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची उलाढाल होत असते. दरवर्षी हा आकडा कोट्यावधी रुपयांच्या पुढे जात असतो. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी विक्री झाली आहे. दरम्यान, यावर्षी सातत्यानं सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा फटका काही ठिकाणी बसला आहे. वाढत्या दरामुळं नागरिकांनी सोन्या चांदीच्या खरेदीकडं पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले होते. लग्नासराईच्या काळातच भारतात मोठ्या व्यवसाय होत आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना परदेशात न जाता भारतात लग्न करण्याचे आवाहन केले होते.


महत्वाच्या बातम्या:


या हंगामात देशात 45 लाख विवाह होणार, 5.5 लाख कोटींचा व्यवसाय होणार