Wedding Season : ऑक्टोबर महिना सुरु धाला आहे. या महिन्यापासून सणांचा हंगाम सुरु होणार आहे. हा सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर देशात लग्नसराई (Wedding Season) सुरू होणार आहे. यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर 2024 या कालावधीत सुमारे 48 लाख विवाह होणार आहेत. यासाठी सुमारे 6 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्था आणि व्यावसायिकांना यंदाच्या लग्नसराईचा मोठा फायदा होऊ शकतो. 


12 नोव्हेंबरपासून लग्नाचा हंगाम सुरु 


12 नोव्हेंबर 2024 पासून लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या संशोधनानुसार, यावर्षी लग्नाच्या हंगामात वस्तू आणि सेवा रिटेल क्षेत्रात सुमारे 5.9 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होऊ शकतो. गेल्या वर्षी सुमारे 35 लाख विवाहांमुळे एकूण 4.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. 2023 मध्ये विवाहासाठी 11 शुभ मुहूर्त होते, जे यावर्षी 18 शुभ आहे. त्यामुळे व्यवसायही वाढेल. CAT च्या मते, या हंगामात एकट्या दिल्लीत 4.5 लाख लग्नांमधून 1.5 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाल्याचा अंदाज आहे.


लग्नासाठी शुभ तारखा कोणत्या?


यावर्षी लग्नाचा हंगाम 12 नोव्हेंबरपासून देव उथनी एकादशीपासून सुरू होईल आणि 16 डिसेंबरपर्यंत चालेल. नोव्हेंबरमध्ये 12, 13, 17, 18, 22, 23, 25, 26, 28 आणि 29 या शुभ तारखा आहेत. तर डिसेंबरमध्ये त्या 4, 5, 9, 10, 11, 14, 15 आणि 16 आहेत. यानंतर, लग्नाचे कार्यक्रम जवळपास महिनाभर थांबतील आणि जानेवारीच्या मध्यापासून मार्च 2025 पर्यंत पुन्हा सुरू होतील.


लग्नसराईच्या काळात या वस्तूंची मागणी वाढते


कॅटचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक आता भारतीय वस्तूंना प्राधान्य देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'वोकल फॉर लोकल' आणि 'आत्मनिर्भर भारत' या आवाहनाला बळ मिळत आहे. लग्नाच्या हंगामात कपडे, साड्या, लेहेंगा, पोशाख, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल उपकरणे, ड्रायफ्रूट्स, मिठाई, किराणा सामान, भाज्या आणि भेटवस्तू यासारख्या वस्तूंची विक्री वाढते. याशिवाय बँक्वेट हॉल, हॉटेल्स, लग्नघरे, इव्हेंट मॅनेजमेंट, तंबू सजावट, खानपान सेवा, फ्लॉवर डेकोरेशन, वाहतूक, कॅब सेवा, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, ऑर्केस्ट्रा, बँड, लाईट आणि साउंड यांची मागणीही वाढते.


लग्नातून मोठी उलाढाल होणार


दरवर्षी सणांचा हंगाम झाला की, लगेच लग्नांचा हंगाम सुरु होतो. यावर्षी देखील नोव्हेंबर महिन्यापासून लग्नांचा मुहूर्त सुरु होणार आहे. मोठ्या प्रमाणात यावर्षी देखील लग्न होणार आहेत. तसेच या माध्यमातून मोठी उलाढाल देखील पाहायला मिळमार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Gold Prices : सणासुदीचा काळ आणि लग्नाचा हंगाम, सोनं वाढणार; यंदा किमतीचा रेकॉर्ड ब्रेक होणार