Warren Buffett : उद्योग जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरन बफे (Warren Buffett) हे एका क्षेत्रात मोठी गुंतवणूक (Investment) करणार आहेत. त्यांची गुंतवणूक ही इतिहासातील सर्वात मोठी असणार आहे. वॉरन बफे अशा उद्योगात पाऊल ठेवणार आहे, की ज्याची पोहोच फक्त करोडोच नाही तर जगभरातील अब्जावधी लोकांमध्ये आहे. आता त्यांची नजर क्रेडिट कार्ड (credit card) उद्योगावर आहे. यासाठी वॉरेन बफे 3 लाख कोटी रुपयांचा खर्च करणार आहेत. क्रेडिट कार्ड उद्योगाबाबत वॉरन बफे यांनी कोणत्या प्रकारची तयारी केली आहे याबाबत सविस्तर माहिती पाहुयात.
वॉरन बफेची एकूण संपत्ती 135 अब्ज डॉलर
ब्लूमबर्ग अब्जाधीश अहवालानुसार, वॉरन बफेची एकूण संपत्ती 135 अब्ज डॉलर आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत. चालू वर्षात वॉरेन बफेच्या एकूण संपत्तीत 15.4 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
वॉरेन बफे करणार 3 लाख कोटी रुपयांचा करार
केवळ अमेरिकाच नाही तर जगातील आघाडीचे गुंतवणूकदार वॉरेन बफे मोठी गुंतवणूक करणार आहेत. वॉरेन बफे समर्थित कंपनी कॅपिटल वन क्रेडिट कार्ड जारी करणारी कंपनी डिस्कव्हर फायनान्शियल खरेदी करणार आहे. क्रेडिट कार्ड उद्योगाच्या इतिहासातील हा जगातील सर्वात मोठा करार मानला जात आहे. हा करार 35.3 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 3 लाख कोटी रुपयांचा असणार आहे. या करारानंतर कॅपिटल वन ही मालमत्तांच्या बाबतीत जगातील सहावी सर्वात मोठी बँक बनेल. कॅपिटन वन बँकेची जेपी मॉर्गन आणि सिटीग्रुपशी तुलना सुरू होईल. दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर, कॅपिटल वन समभागधारक कंपनीतील 60 टक्के समभाग धारण करतील तर उर्वरित भागभांडवल डिस्कव्हर समभागधारकांकडे असणार आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, बफेची एकूण संपत्ती 135 अब्ज डॉलर आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत. चालू वर्षात वॉरेन बफेच्या एकूण संपत्तीत 15.4 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
19 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत निघणार
क्रेडिट कार्ड उद्योगात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी डील बँक ऑफ अमेरिकाच्या नावावर आहे. बँकेने 2005 मध्ये MBNA कॉर्प 35.2 बिलियन डॉलरला विकत घेतले होते. या घटनेला 19 वर्षे झाली आहेत. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार, बफेच्या एकूण पोर्टफोलिओपैकी निम्मा ॲपलमध्ये आहे.बफेच्या पोर्टफोलिओमधील दुसरा सर्वात मोठा स्टॉक बँक ऑफ अमेरिका आहे. हे त्याच्या एकूण पोर्टफोलिओच्या 9 टक्के आहे. अमेरिकन एक्सप्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा 7.2 टक्के पोर्टफोलिओ या कंपनीत आहे. वॉरन बफे यांनीही कोका-कोलामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचा हिस्सा 7.1 टक्के आहे. बफे यांनी शेवरॉन, ऑक्सीडेंटल पेट्रोलियम, क्राफ्ट हेन्झ आणि मूडीजमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.
महत्वाच्या बातम्या: