मुंबई : भारतीय शेअर बाजारात विविध कंपन्यांचे आयपीओ लिस्ट होत आहेत. आयपीओला गुंतवणूकदारांकडून देखील चांगला प्रतिसाद दिला जात आहे. विशाल मेगा मार्टचा आयपीओ गुंतवणुकीसाठी आजपासून खुला झाला आहे. विशाल मेगा मार्टचा आयपीओ खुला होण्यापूर्वीच कंपनीनं अँकर इनवेस्टर्सकडून 2399.99 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून एकूण 8 हजार कोटी रुपयांच्या उभारणीचा प्रयत्न आहे. 


विशाल मेगा मार्टनं अँकर इनेवस्टर्सला 30.76 कोटी शेअर्सची विक्री केली. या शेअर्सचा किंमतपट्टा 78 रुपये ते 89 रुपयांदरम्यान आहे. एसबीआय मल्टीकॅप फंडला विशाल मेगा मार्टचे 6 टक्के शेअर मिळाले. तर, सिंगापूर सरकारनं 30.76 कोटी पैकी  5.32 टक्के तर अ‍ॅक्सिस  इएलएसएस टॅक्स सेवर फंड  आणि नोमुरा फंड आयरलँड पब्लिक लिमिटेडला 4.17 टक्के शेअर मिळाले. 


भारतातील एकूण 18 म्युच्यूल फंडसकडून 44 योजनांद्वारे विशाल मेगा मार्टमध्ये गुंतवणूक केली. त्यांनी एकत्रितपणे अँकर इनवेस्टर्सच्या कोट्यापैकी 53.33 टक्के कोटा म्युच्यूअल फंडनं मिळवला.  


एसबीआय मल्टी कॅप फंड, अ‍ॅक्सिस इएलएसएस टॅक्स सेवर फंड, एचडीएफसी स्मॉल कॅप फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल फ्लेक्सीकॅ फंड, आयसीआयसीआय इनोवेशन फंड यांनी विशाल मेगा मार्टमध्ये अधिक गुंतवणूक करत शेअर्स मिळवले. 


विशाल मेगा मार्टच्या आयपीओचे  बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, इंटेन्सिव्ह फिस्कल सर्विसेस प्रायवेट लमिटेड जेफरीज इंडिया प्रायवेट लिमिटेड, जे पी मॉर्गन इंडिया प्रायवेट लिमिटेड, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी प्रायवेट लिमिटेड यांची निवड करण्यात आली आहे. 


विशाल मेगा मार्ट या आयपीओद्वारे 8 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. या आयपीओद्वारे नवे शेअर जारी केले जाणार नाहीत. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलसाठी असणार आहे. समायत सर्विसेस एलएलपी हे विशाल मेगा मार्टचे प्रमोटर्स पैकी एक आहेत, त्यांच्याकडील शेअर्स विकले जाणार आहेत. 


या आयपीओचा किंमत पट्टा प्रति शेअर 74 ते 78 रुपयांदरम्यान आहे. एका लॉटमध्ये 190 शेअर असतील. विशाल मेगा मार्टचा आयपीओ एनएसई आणि बीएसईवर देखील लिस्ट होणार आहे. विशाल मेगा मार्टचं देशभरात नेटवर्क आहे. 


इतर बातम्या : 


Amazon : अमेझॉनच्या विकसित भारत संकल्पनेसाठी दोन मोठ्या योजना, भारतातून जगभरात 80 अब्ज डॉलर्सची निर्यात करणार अन्...


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)