Devendra Fadnavis : केंद्र सरकारकडून UPA च्या कार्यकाळाशी म्हणजे 2004 ते 2014 या कालावधीशी तुलना करणारी श्वेतपत्रिका जाहीर केली आहे. हा संपूर्ण कार्यकाळ केवळ घोटाळ्यांचा कार्यकाळ होता. मात्र, गेल्या दहा वर्षाचा एनडीएचा कार्यकाळ हा विकासाचा कार्यकाळ होता असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलं. यूपीएच्या (UPA) दहा वर्षात महागाईचा सरासरी दर 8.2 टक्के होता, एनडीए (NDA) काळात तोच महागाई दर पाच टक्के असल्याचे फडणवीस म्हणाले.


एनडीएच्या धोरणामुळं या बँका संकटातून बाहेर


2004 ते 2014 यूपीएच्या कार्यकाळाशी तुलना करणारी श्वेतपत्रिका केंद्र सरकारने जाहीर केली आहे. हा संपूर्ण कार्यकाळ केवळ घोटाळ्यांचा कार्यकाळ होता. गेल्या दहा वर्षाचा एनडीएचा कार्यकाळ हा विकासाचा कार्यकाळ होता. यूपीएच्या दहा वर्षात महागाईचा सरासरी दर 8.2 टक्के होता, एनडीए काळात तो पाच टक्के आहे. यापेक्षा अधिक महागाई यूपीएच्या काळात आपण पाहिल्याचे फडणवीस म्हणाले. यूपीएच्या काळात सरकारी बँका डबघाईला आल्या एनडीएच्या धोरणामुळं या बँका संकटातून बाहेर आल्याचे ते म्हणाले. या बँका सध्या नफ्यामध्ये आहेत, हे श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून पाहायला मिळल्याचे फडणवीस म्हणाले. 


गॅस धारकांची संख्या 31 कोटींहून अधिक 


यूपीएच्या दहा वर्षात 2014 पर्यंत भारतात केवळ 14 कोटी गॅस कनेक्शन होते आणि एनडीए काळात गॅस धारकांची संख्या 31 कोटींहून अधिक संख्या वाढली. 18000 गाव गेल्या दहा वर्षात विद्युतीकरण करण्यात आली आहेत.  यूपीए काळात सरासरी प्रतिदिन दहा तास वीज उपलब्ध व्हायची आता ती सरासरी दररोज एकवीस तास मिळते, हा मोठा फरक आहे. डीबीटीच्या माध्यमातून दहा कोटी खात्यांना फायदा मिळायचा, त्यातून सरकारी योजना पोहोचायच्या आता 166 कोटी लोकांना 310 शासकीय योजनांचा फायदा होत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस म्हणाले. यूपीए काळात 387 मेडिकल कॉलेज भारतात होती. आजच्या स्थितीला ती संख्या 706 म्हणून अधिक आहे. जवळपास 51 हजार डॉक्टर देशात तयार व्हायचे ती स्थिती आज लाखाच्यावर गेली आहे, केवळ दहा वर्षात हे घडल्याचे फडणवीस म्हणाले. 


अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी 2024 ला मोदी सरकारच्या (Modi Govt) दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी युपीए आणि आताच्या एनडीए सरकारच्या कार्यकाळाची तुलना करणारी श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.


महत्वाच्या बातम्या:


नाशिकचं राजकीय वातावरण तापलं, फडणवीसांचा आज दौरा, भाजपा करणार नाशिक लोकसभेवर दावा