Aadhaar Update Process: UIDAI ने आधार कार्डधारकांसाठी (Aadhar Card) एक मोठी सुविधा आणली आहे. आता तुम्ही कोणत्याही कागदपत्राशिवायही तुमचे आधार अपडेट (Aadhar Updates) करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या 'कुटुंब प्रमुखाची' परवानगी लागणार आहे. अनेक वेळा आधार अपडेट करताना सर्वसामान्यांना वेगवेगळ्या अडचणीचा सामना करावा लागतो.


कोणासाठी फायदेशीर ठरणार ही सुविधा 


ज्यांच्याकडे स्वतःची कागदपत्रे नाहीत त्यांच्यासाठी 'हेड ऑफ फॅमिली' आधारित आधार अपडेट प्रक्रिया खूप फायदेशीर आहे. संबंधित व्यक्ती त्यांच्या कुटुंब प्रमुखाच्या कागदपत्रांचा वापर करून आधारमध्ये टाकलेली माहिती सहज अपडेट करू शकतात. मुले, पत्नी/पती, आई-वडील यांसारख्या लोकांना त्याचा लाभ मिळू शकतो. 


अनेक वेळा मुलांकडे आधार व्यतिरिक्त कोणतीही कागदपत्रे नसतात. अशा परिस्थितीत तो त्याच्या पालकांच्या कागदपत्रांचा वापर करून आधार अपडेट करू शकतो. UIDAI ने 3 जानेवारी 2023 रोजी या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, आता फक्त 'कुटुंब प्रमुख' दस्तऐवजांच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्वतःच्या कागदपत्रांशिवायही आधार अपडेट करू शकता.


कुटुंब प्रमुखांच्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार 


या प्रकरणाची माहिती देताना UIDAI ने म्हटले आहे की, जर तुम्हाला 'हेड ऑफ फॅमिली'च्या कागदपत्रांद्वारे तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीसोबतचे तुमचे नाते सिद्ध करावे लागेल. यासाठी तुम्हाला रेशनकार्ड, मार्कशीट, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट यासारखी कागदपत्रे आवश्यक असतील. तुमच्याकडे कोणतीही असे कागदपत्र नसल्यास Self Declaration भरून UIDAI कडे सादर करावे लागेल. 


कुटुंब प्रमुखांच्या मदतीने असे करा आधार अपडेट


> कुटुंब प्रमुखाच्या कागदपत्रांच्या मदतीने तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, सर्वप्रथम My Aadhaar पोर्टल https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्या.


>  पोर्टलवर गेल्यानंतर आधार अपडेटची प्रक्रिया निवडा.


>  आधारमध्ये अॅड्रेस अपडेटचा पर्याय निवडा.


> यानंतर, जर तुमच्याकडे स्वतःचे कागदपत्र नसेल, तर पत्ता अपडेटसाठी 'कुटुंब प्रमुख' चा आधार क्रमांक टाका.


> यानंतर तुम्हाला Relationship डॉक्युमेंट सबमिट करावे लागेल.


> यानंतर पत्ता अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल.


> यानंतर Service Request Number HOF ला पाठवला जाईल. यानंतर, आधार पोर्टलवर लॉग इन करून त्याला 30 दिवसांच्या आत मान्यता द्यावी लागेल.


> त्यानंतर, तुमचा आधार तुमच्या HOF च्या मंजुरीने अपडेट केला जाईल.


> 30 दिवसांच्या आत मंजुरी न मिळाल्यास, ही विनंती नाकारली जाईल.