India vs Sri lanka T20I: पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. वानखेडे येथे सुरु असलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंहला मुकावं लागले आहे. त्यामुळे युवा गोलंदाज शिवम मावी याला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय शुभमन गिल याचेही टी20 मध्ये पदार्पण केलेय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरली आहे. 






दासुन शनाका नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडेच्या मैदानावर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजयाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच श्रीलंकेनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्या अनेक वर्ष मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्यामुळे मैदानाची परिस्थिती पांड्याला चांगली माहिती आहे. त्यामुळे हा सामना रोमांचंक होण्याची शक्यता आहे. 


कसा आहे भारतीय संघ - 
शुभमन गिल, इशान किशन (विकेटकिपर), सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, शिवम मावी, युजवेंद्र चहल, उमरान मलिक {S Gill, I Kishan (wk), S Yadav, S Samson, Hardik Pandya (c), A Patel, D Hooda, H Patel, S Mavi, Y Chahal, U Malik}






श्रीलंकेचा संघ
पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजय डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कप्तान), वानिन्दु हसरंगा, चामिका करुणारत्ने, महेश थीक्षणा, कसुन रजिता आणि दिलशान मदुशंका. 
[Kusal Mendis, Pathum Nissanka, Dhananjaya de Silva, Charith Asalanka, Bhanuka Rajapaksa, Dasun Shanaka, Wanindu Hasaranga, Chamika Karunaratne, Maheesh Theekshana, Kasun Rajitha, Dilshan Madushanka]






हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत. यातील 17 सामने भारतानं जिंकले आहेत. तर, 8 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवता आलाय. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय. भारतानं घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत एकूण 14 टी-20 सामने खेळले आहेत. यातील 14 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, दोन सामन्यात श्रीलंकेच्या संघाला बाजी मारता आली. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरलाय.


कसा असेल श्रीलंकेचा भारत दौरा?
 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका सुरू होणार आहे. हा सामना मुंबईत होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 5 जानेवारीला पुण्यात आणि 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर लगेच 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरूवात होईल. पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटी येथे होणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारीला आणि तिसरा सामना 15 जानेवारीला होणार आहे.