TRAI : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) स्पेक्ट्रमच्या किमतींबाबत बहुप्रतिक्षित शिफारशींमध्ये, विविध स्पेक्ट्रम बँडसाठी राखीव किंमत 39 टक्क्यांनी कमी ठेवण्याची सूचना केली आहे. ट्रायने सोमवारी 3300-3670 मेगाहर्ट्झ बँडमधील 5G स्पेक्ट्रमच्या किंमतीत 35 टक्के कपात करून ती 317 कोटी रुपये प्रति मेगाहर्ट्झ ठेवण्याची शिफारस केली आहे. सरकार यावर्षी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची तयारी करत आहे. चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 5G मोबाइल सेवा सुरू करण्यासाठी खाजगी दूरसंचार युझर्सना 5G स्पेक्ट्रम द्यावा लागेल. यामुळे इंटरनेट आणि अपलोडिंगचा वेग अधिक वेगवान होईल अशी अपेक्षा आहे.
नवीन स्पेक्ट्रम बँडमध्ये लिलाव
TRAI ने म्हटलंय की, टेलिकॉम युझर्ससाठी 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz, 2500 MHz आणि 600 MHz च्या नवीन स्पेक्ट्रम बँडमध्ये 800 MHz, 900 MHz, आणि 600 MHz, स्पेक्ट्रम 3300-3670 MHz आणि 24.25-28.5 GHz च्या नवीन स्पेक्ट्रम बँडमध्ये लिलाव केले जातील. ", 3300-3670 MHz बँडसाठी 10 MHz आणि 24.25-28.5 GHz बँडसाठी 50 MHz चा ब्लॉक ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे,"
गेल्या वर्षी 492 कोटी रुपये प्रति मेगाहर्ट्झ राखीव किंमतीची शिफारस
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रायने मागच्या वेळेच्या तुलनेत यावेळी वेगवेगळ्या बँडमध्ये 39 टक्के कमी राखीव किंमत ठेवली आहे. प्रति मेगाहर्ट्झ जी मागील वेळेपेक्षा 35 टक्के कमी आहे. गेल्या वर्षी ट्रायने या स्पेक्ट्रमसाठी 492 कोटी रुपये प्रति मेगाहर्ट्झ राखीव किमतीची शिफारस केली होती.
3,927 कोटी रुपये प्रति मेगाहर्ट्झ
त्याच बरोबर, TRAI कडून 700 मेगाहर्ट्झसाठी किंमत 3,927 कोटी रुपये प्रति मेगाहर्ट्झ ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. जी आता 40 टक्के कमी आहे. TRAI ने म्हटले आहे की, दूरसंचार सेवा युझर्सना दूरसंचार क्षेत्रातील दीर्घकालीन वाढ आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी सुलभ पेमेंट पर्यायांना देखील परवानगी द्यावी.