Top Electric Cars: सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्या भारतीय बाजारात एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार आणत आहेत. या कार सर्वोत्तम आणि अॅडव्हान्स फीचर्ससह सुसज्ज आहेत. त्यांची किंमत पेट्रोल-डिझेल कारपेक्षा थोडी जास्त आहे, परंतु इलेक्ट्रिक कार आपल्यासाठी किफायतशीर ठरू शकतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या कार प्रदूषण करत नाहीत. यामुळेच त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. भारतीय बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या तीन सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार बद्दल आज जाणून घेऊयात.
टाटा टिगोर ईव्ही (Tata Tigor EV)
जरी टाटाच्या गाड्या देशात सर्वाधिक पसंत केल्या जातात, परंतु आजकाल टाटाची Tata Tigor EV ही इलेक्ट्रिक कार बाजारात चर्चेचा विषय राहिली आहे. ही आलिशान दिसणारी कार एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 215 किलोमीटर पर्यंत धावते. या कारला 21.5 kWh ची बॅटरी मिळत आहे, जी 12 तासात पूर्ण चार्ज होते. विशेष गोष्ट म्हणजे या कारची किंमत सुमारे 13 लाख रुपये आहे, जी इतर कारच्या तुलनेत कमी आहे.
महिंद्रा ई-वेरिटो (Mahindra E-Verito)
इलेक्ट्रिक कारच्या बाबतीतही महिंद्रा खूप वेगाने पुढे जात आहे. महिंद्राची इलेक्ट्रिक कार Mahindra E-Verito जबरदस्त फीचर्ससह सुसज्ज आहे. एकदा ही कार पूर्ण चार्ज झाली की, तुम्ही 140 किमी पर्यंत गाडी चालवू शकता. यात 21.2 kWh ची बॅटरी आहे, जी 12 तासात पूर्णपणे चार्ज होते. या महिंद्रा कारची सुरुवातीची किंमत सुमारे 14 लाख रुपये आहे.
ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक (Hyundai Kona Electric)
Hyundai Kona Electric ही इलेक्ट्रिक कार सध्या भारतीय बाजारात चर्चेत आहे. एकदा ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार पूर्ण चार्ज झाल्यावर तुम्ही 450 किमी पर्यंत प्रवास करू शकता. यात 39.2 kWh ची मजबूत बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तुम्ही फक्त 7 तासात ही कार पूर्णपणे चार्ज करू शकता. ही कार उत्तम डिझाईनची आहे. या कारची किंमत सुमारे 24 लाख रुपये आहे.