Google Laying Off Employees : जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याची तयारी सुरू केली आहे. नुकतेच मायक्रोसॉफ्टने आपल्या 200 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते.  आता आणखी एक दिग्गज टेक कंपनी गुगलनेही कर्मचाऱ्यांना इशारा दिला होता. गुगलचे म्हणणे आहे की, कर्मचार्‍यांच्या कामगिरीत सुधारणा न झाल्यास आणि पुढील तिमाहीचे आकडे अपेक्षेप्रमाणे नसल्यास कर्मचाऱ्यांनी पुढील परिणामासाठी तयार राहावे. विक्रीच्या उत्पादकतेसोबतच कर्मचाऱ्यांच्या एकूण कामाचेही मूल्यमापन केले जाईल, असा इशारा गुगलच्या विक्री विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिला आहे. 


जुलैमध्ये Google ने सांगितले की, ते दोन आठवड्यांसाठी भरती प्रक्रिया थांबवत आहेत. जेणेकरून ते कर्मचार्यांच्या संख्येची समीक्षा करू शकतील. नंतर ही संपूर्ण भरती प्रक्रिया 2022 पर्यंत स्थगित करण्यात आली. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले होते की, हे स्पष्ट आहे की कंपनी आव्हानांना तोंड देत आहे. पुढचा रस्ता सोपा दिसत नाही. पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, ज्या प्रकारची आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याला आपली उत्पादकता आणखी वाढवावी लागेल. ते म्हणाले की, आपल्याकडे जितके लोक आहेत, त्याप्रमाणे आपली उत्पादकता नाही. ही गंभीर चिंतेची बाब आहे.


Google ची मूळ कंपनी Alphabet ने एप्रिल-जून (दुसऱ्या तिमाही) तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी कमाई आणि महसूल प्राप्त केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 62 टक्क्यांच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या महसुलात केवळ 13 टक्के वाढ झाली आहे. अशातच गुगलच्या उत्पन्नात घट होत असल्याचे दिसून येत आहे. LinkedIn, Meta, Facebook, Oracle, Twitter, Nvidia, Snapchat, Uber, Spotify, इंटेल आणि मायक्रोसोफ्ट (Intel & Microsoft) अशा अनेक तंत्रज्ञान कंपन्या आहेत ज्यांना दबावाचा सामना करावा लागत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


SBI : आता एसबीआयची सुद्धा कर्जे महागली, तुमचा EMI किती वाढेल ते जाणून घ्या
Mukesh Ambani : 3 तासांत खात्मा करणार... 8 वेळा फोन; अँटिलिया प्रकरणानंतर पुन्हा अंबानी कुटुंबाला धमकी
Multiplex Popcorn Price : 10 रुपयाला मिळणारे पॉपकॉर्न मल्टिप्लेक्समध्ये महाग का? पीव्हीआरच्या सीएमडींनी स्पष्टच सांगितले