Continues below advertisement

Tech Sector Layoffs मंबई: 2025 मध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. लेऑफ्स एफवाय आयच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत 218 कंपन्यांमधून 1 लाख हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आलं आहे. अमेरिकेतली सिलिकॉन व्हॅली ते भारतात बंगळुरुतील दिग्गज कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली आहे.

लेऑफ्सचं प्रमुख कारणं आर्टफिशिअल इंटेलिजन्स, क्लाउड सर्व्हिसेस आणि नफ्यावर कंपन्यांनी पुन्हा लक्ष केंद्रीत करणं ही आहेत. करोनाच्या काळात अधिक नोकरभरती झाल्यानंतर कंपन्या आता खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Continues below advertisement

Tech Companies Layoffs : टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात

इंटेल कंपनीनं यंदा सर्वात मोठी कर्मचारी कपात केली आहे. इंटेलमधून 24000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आलं आहे. जे एकूण मनुष्यबळाच्या 22 टक्के आहे. अमेरिका, जर्मनी, कोस्टारिका आणि पोलंडमधील कारखान्यातून कर्मचारी कपात करण्यात आली होती. Nvidia आणि AMD या कंपन्यांच्या स्पर्धेत पिछाडीवर पडल्यानंतर इंटेल पुन्हा मजबूत होण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेझॉन कंपनीनं त्यांच्या ऑपरेशन्स, एचआर, क्लाउड यूनिटसमधील 14000 नोकऱ्या समाप्त केल्या आहेत. अमेझॉनचे सीईओ एंडी जेसी यांनी कंपनी जगातील सर्वात मोठ्या स्टार्टअपच्या दिशेनं काम करत आहेत. एआयमधील गुंतवणुकीसाठी रिसोर्स तयार करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

मायक्रोसॉफ्टमधून 9000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आलं आहे. हे कर्मचारी प्रोडक्ट आणि सॉफ्टवेअर विभागातील आहेत. कंपनी आता एआय आणि क्लाउड इनोवेशन विभागावर लक्ष केंद्रीत करत आहे.

गुगल आणि मेटानं देखील अँड्राईड, हॉर्डवेअर, आणि एआय टीममध्ये कपात केली आहे. दोन्ही कंपन्या खर्च कपातीचं धोरण राबवत आहेत. ओरॅकल कंपनीनं देखील मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या संपवल्या आहेत.

भारतातील आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी टीसीएसनं जुलै ते सप्टेंबरमध्ये 20000 नोकऱ्या कमी केल्या आहेत. ही कंपनीच्या इतिहासातील एका तिमाहीतील सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे. कंपनीनं यासाठी एआय बेस्ड रिस्ट्रक्चरिंग आणि स्किल मिसमॅचचं कारण दिलं आहे. 2022 नंतरची ही मोठी कर्मचारी कपात आहे.

इतर क्षेत्रातही कर्मचारी कपात

टेक कंपन्यांप्रमाणं लॉजिस्टिक्स कंपनी UPS मध्ये देखील कर्मचारी कपात केली जाणार आहे. कंपनी 48000 नोकऱ्या संपवणार आहे. ऑटो क्षेत्रातील फोर्ड कंपनी देखील 8000 ते 13000 कर्मचारी कमी करु शकते.

PwC कंपनीनं टॅक्स आणि ऑडिट प्रोसेसमध्ये एआय आणल्यानं जागतिक पातळीवर 5600 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. मीडिया कंपनी पॅरामाऊंट ग्लोबलनं स्ट्रीमिंग लॉस आणि जाहिरातींचा कमी प्रतिसाद असल्यानं 2000 कर्मचारी कपात केली आहे.