Tata Steel stock will split record : टाटा समूहाची कंपनी टाटा स्टील आपले शेअर्स विभाजित करणार आहे. टाटा स्टीलच्या (Tata Steel) स्टॉक स्प्लिटची एक्स-डेट 28 जुलै 2022 आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सच्या विभाजनाची रेकॉर्ड तारीख 29 जुलै आहे. टाटा स्टीलचे (Tata Steel) शेअर्स 1:10 च्या प्रमाणात विभाजित होणार आहेत. स्टॉक स्प्लिट (Stock Split) झाल्यानंतर टाटा स्टीलच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 ते 1 रुपये होईल. या वर्षी मे मध्ये चौथ्या तिमाहीचे FY22 निकाल जाहीर करताना टाटा स्टीलच्या बोर्डाने स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली होती.
प्रत्येक शेअरवर रु.51 चा अंतिम लाभांश
टाटा स्टीलने यापूर्वी प्रति शेअर 51 रुपये अंतिम लाभांश दिला आहे. अंतिम लाभांशाची एक्स-डेट १५ जून २०२२ होती. भांडवली बाजारात तरलता वाढवण्यासाठी शेअर विभाजित करण्याचा टाटा स्टीलने हा निर्णय घेतला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे शेअरहोल्डर बेस वाढेल आणि लहान गुंतवणूकदारांना शेअर्स अधिक परवडणारे बनतील. स्टॉक स्प्लिटमुळे (Tata Steel) शेअरची बाजारातील किंमत कमी होते. परंतू यामुळे कंपनीचे बाजार भांडवल बदलत नाही.
एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 27% घसरण
गेल्या एका वर्षात टाटा स्टीलचे शेअर्स जवळपास 27% घसरले आहेत. 26 जुलै 2021 रोजी टाटा स्टीलचे (Tata Steel) शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 1298.10 रुपयांच्या पातळीवर होते. सध्या, 25 जुलै 2022 रोजी, कंपनीचे शेअर्स BSE वर 957.35 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. यावर्षी आतापर्यंत टाटा स्टीलचे शेअर्स जवळपास 16% घसरले आहेत. गेल्या एका महिन्यात कंपनीचे शेअर्स जवळपास 11 टक्क्यांनी वाढले आहेत. टाटा स्टील ही 34 दशलक्ष टन वार्षिक उत्पादन क्षमता असलेल्या जागतिक स्टील कंपन्यांपैकी एक आहे. टाटा स्टीलचे जगातील अनेक देशांमध्ये अस्तित्व आहे.
आणखी वाचा :
Bloomberg Survey : अमेरिका, चीनसह आशिया युरोपमध्ये मंदीचं सावट, भारतासाठी मात्र दिलासा