Tata Group : भारतातील दिग्गज उद्योग समूह असलेल्या टाटा समूहाबाबत (Tata Group) एक महत्त्वाची बातमी आहे. टाटा समूहातील टाटा कॉफी लिमिटेड (Tata Coffee Limited - TCL) आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेड (Tata Consumer Products Limited - TCPL) आणि तिची पूर्ण मालकीची उपकंपनी TCPL बेव्हरेजेस अँड फूड्स लिमिटेड (TBFL) यांच्यातील विलीनीकरण योजना 1 जानेवारी 2024 पासून अंमलात येणार आहे. या योजनेनुसार, टाटा कॉफी कंपनीच्या कॉफीच्या मळा व्यवसाय टीसीपीएल बेव्हरेजेस अँड फूड्समध्ये डिमर्ज करणे आणि उर्वरित व्यवसाय टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्समध्ये विलीन करणे समाविष्ट आहे. विलिनीकरण अंतर्गत व्यवसाय वेगळे करण्याची प्रक्रिया केली जाईल.
गेल्या महिन्यात मिळाली होती मंजुरी
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) कोलकाता खंडपीठाने गेल्या महिन्यात TCL चे TCPL आणि TCPL बेव्हरेजेस अँड फूड्स (TBFL) नावाच्या त्याच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली होती.
शेअर दराची काय स्थिती?
वर्षाच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, टाटा समूहाच्या दोन प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली. टाटा कॉफी लिमिटेड आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे शेअर्स वधारले. टाटा कंझ्युमरचे शेअर 4.30 टक्क्यांनी वधारत 1086.80 रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, टाटा कॉफीचे शेअर्स 4.14 टक्क्यांनी वधारत 320.90 रुपयांवर बंद झाला.
टाटा स्टीलची गुंतवणूक
टाटा स्टीलचे युनिट असलेल्या टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (TCIL) ने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. झारखंडमधील जमशेदपूर येथे वार्षिक तीन लाख क्षमतेचा उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी कंपनी रु. 1,785 कोटींची गुंतवणूक करणार आहे. टीसीआयएलने सांगितले की, विस्तार प्रकल्पांतर्गत, हा प्लांट 2026 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. यामुळे सुमारे 600 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा ऐतिहासिक सामंजस्य करार जमशेदपूरमध्ये सुमारे 1,787 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह वार्षिक तीन लाख टन (TPA) क्षमतेसह अत्याधुनिक उत्पादन युनिट सुरू होणार आहे. टाटा स्टीलचा शेअर शुक्रवारी एक टक्क्याने वाढला आणि व्यवहाराअंती तो 140 रुपयांवर बंद झाला.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर खरेदी अथवा विक्रीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करताना शेअर बाजार तज्ज्ञांसोबत सल्लामसलत करावे.)