New Year 2024 : पुढील दोन दिवसातच नवीन वर्ष 2024 (New Year 2024) सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. पुढील वर्षी अनेक मोठे बदल होणार आहेत. यामध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीपासून ते वाहनांच्या किमतीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. 1 जानेवारीपासून होणार्‍या बदलांवर एक नजर टाकूया...


लोकसभेच्या निवडणुका या 2024 मध्येच होणार आहेत. याशिवाय सिम कार्ड आणि जीएसटीबाबतही एक मोठे अपडेट समोर आले आहे. 1 जानेवारीपासून एकूण 8 गोष्टीमध्ये बदलत आहेत. यामध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीपासून ते वाहनांच्या किमतीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. 1 जानेवारीपासून पैशाशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. याचा ताण सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 


1 जानेवारीपासून हे नियम बदलणार 


UPI निष्क्रिय होईल 


1 जानेवारी 2024 पासून मागील 1 वर्षापासून बंद असलेली UPI खाती बंद केली जातील. Paytm, PhonePe आणि Google Pay सारख्या बँका आणि तृतीय पक्ष अॅप्स देखील 1 जानेवारीपासून असे UPI आयडी निष्क्रिय करतील ज्यात गेल्या एका वर्षात कोणताही व्यवहार झाला नाही.


सिम कार्डच्या देवाणघेवाणीचे नियम 


1 जानेवारीपासून सिम घेण्यासाठी डिजिटल केवायसी करणे आवश्यक असणार आहे. कारण दूरसंचार विभागाने पेपर आधारित केवायसी बंद केली आहे.


आयटीआर फाइलिंग 


तुम्हाला 1 जानेवारीपासून आयटीआर फाइलिंगसाठी दंड भरावा लागेल. 31 डिसेंबर ही विलंबित ITR रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. अशा परिस्थितीत 1 जानेवारीपासून दंड आकारण्यात येणार आहे.


डिमॅट खाते नॉमिनी 


जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक किंवा व्यापार करत असाल तर त्यात निश्चितपणे नॉमिनी जोडा. SEBI ने आपली अंतिम मुदत 31 डिसेंबर वरून 30 जून 2024 पर्यंत वाढवली आहे.


पार्सल पाठवणे महाग होणार 


नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पार्सल पाठवणे महाग होऊ शकते. ओव्हरसीज लॉजिस्टिक ब्रँड ब्लू डार्टने पार्सल पाठवण्याच्या दरात 7 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.


गॅस सिलेंडरच्या किंमती 


गॅस सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवल्या जातात. अशा स्थितीत वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी गॅस सिलिंडरच्या किंमतीबाबत मोठी घोषणा होऊ शकते.


वाहने घेणे महागणार 


1 जानेवारीपासून देशातील अनेक बड्या कार कंपन्यांनी वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत आलिशान वाहनांचीही नावे आहेत.


पासपोर्ट-व्हिसा नियम 


वर्ष 2024 पासून, परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी त्यांचा अभ्यास संपण्यापूर्वी व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. म्हणजेच तोपर्यंत कोणत्याही देशातील विद्यार्थी वर्क व्हिसावर जाऊ शकणार नाहीत. त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत.


महत्त्वाच्या बातम्या:


उरले फक्त 3 दिवस, 1 जानेवारीपासून कार च्या दरात होणार वाढ, 'या' कंपन्या वाढवणार दर