Swimwear Demand Rise : दिवसेंदिवस तापमानात (Temperature) मोठी वाढ होताना दित आहे. जवळपास बहुतांश जिल्ह्यातील तापमान हे 40 अंशाच्या पुढे गेलं आहे. नागरिकांच्या अंगाची काहीली होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळं (Heat) अनेक ठिकाणी स्विमिंगपुलावर पोहण्यासाठी (swimming) गर्दी होताना दिसतेय. त्यामुळं या काळात स्विमवेअर (swimwear) कपड्यांचा मागणीत मोठी वाढ झालीय. स्विमवेअर कपड्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे.  


आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल


उन्हाळा आला की लहान मुले स्विमिंग पूलमध्ये पोहाण्यास शिकायला येतात. तसेच वयानं मोठे लोकही पोहोयला स्विमिंग पुलमध्ये येतात. या काळात पोहण्यासाठी लागणारी कपडे खरेदी करावी लागतात. या कपड्यांची मोठी खरेदी विक्री या काळात होते. यामध्ये महिलांच्या बिकिनीची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत असते. या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात या कपड्यांची विक्री होत आहे.  यामध्ये अमेरिका आणि जपाव सर्वात आघाडीवर असणारे देश आहेत. 


दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार


जगात स्विमवेअर कपड्यांची बाजारपेठेचा विचार केला तर उलाढाल ही दोन लाख कोटी रुपयांची आहे. रिसर्च अँड मार्केट डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार 2023 मध्ये जगभरात स्विमवेअरचा व्यवसाय हा  1.90 लाख कोटी रुपये झाला होता. यावर्षी मागणीत 7 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे यावर्षी स्विमवेअर कपड्यांची उलाढाल ही 2 लाख कोटी रुपये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


या देशात मोठ्या प्रमाणात स्विमवेअर कपड्यांचं उत्पादन 


दरम्यान,  रिसर्च अँड मार्केट डॉट कॉम या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान ही जगातील बिकिनीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तसेच इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, ब्राझील, भारत आणि स्पेनमध्येही मोठी मागणी आहे. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा बिकिनी उत्पादक देश आहे. करार पद्धतीनुसार मोठ्या प्रमाणात इंडोनेशियामध्ये बिकीनीचे उत्पादन केले जाते. तसेच चीनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात  स्विमवेअर कपड्यांचं उत्पादन घेतलं जातं. 


दिवसेंदिवस वाढत जाणारी उष्णता हा चिंतेचा विषय 


दरम्यान, दिवसेंदिवस वाढत जाणारी उष्णता हा चिंतेचा विषय बनत आहे. बहुतांश ठिकाणी 40 अंशाच्या पुढे तापमान गेलं आहे. या काळात लोकानी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. कारण वाढती उष्णता ही आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.  


महत्वाच्या बातम्या:


वाढत्या गर्मीत थंडगार हवा, व्होल्टास ते ब्लू स्टार 'या' टॉप-5 AC कंपन्यांनी मिळवला भरघोस नफा