Swiggy May Fire 250 Employees : अलिकडे अनेक दिग्गज टेक कंपन्यांकडून (Tech Companies) नोकरकपात (Layoff) झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता फूड डिलिव्हरी ॲप (Food Delivery App) स्विगी (Swiggy) कंपनीही कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डिसेंबर महिन्यामध्ये स्विगी कंपनी नोकरकपात करण्याची शक्यता आहे. स्विगी 3 ते 5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. इकोनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या नोकरकपातीमध्ये स्विगीच्या देशभरातील कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.


स्विगीही कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता


मीडिया रिपोर्टनुसार, स्विगीकडून ग्राहक सेवा विभाग (Customer Care Department), तंत्रज्ञान आणि उत्पादन विभागातून नोकरकपात होण्याची शक्यता आहे. स्विगीने नोव्हेबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठं किचनही बंद केलं आहे. स्विगी निवडक लोकांमध्ये अधिक चोखपणे काम करण्याची योजना आखत आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर कर्मचाऱ्यांना रेटींग्स, बोनस किंवा कामावरून टाकण्याच्या निर्णय घेण्यात येईल, असं एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.


शेकडो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात


येत्या काळात स्विगी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना हटवण्यात येऊ शकतं. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी सध्या 250 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता आहे. पण हा आकडा वाढू शकतो. अलीकडच्या काळात अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना हटवलं जात आहे. या कंपन्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. 


येत्या काळात स्विगी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना हटवण्यात येऊ शकतं. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी सध्या 250 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता आहे. पण हा आकडा वाढू शकतो. अलीकडच्या काळात अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना हटवलं जात आहे. या कंपन्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. 


स्विगी (Swiggy) कंपनी सध्या आर्थिक संकटामध्ये सापडल्याचं म्हटलं जात आहे. स्विगी ही भारतीय फूड डिलिव्हरी ॲप कंपनी आहे. श्रीहरी मजेटी (Sriharsha Majety) स्विगीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) म्हणजे सीईओ (CEO) आहेत.


सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, स्विगीचे एचआर प्रमुख गिरीश मेनन यांनी अलिकडेच कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित नोकरकपात होण्याची माहिती दिली. ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या मते, स्विगी कंपनीला जानेवारी ते जून दरम्यान 315 दशलक्ष डॉलरचं नुकसान झालं आहे. इकॉनमिक टाइम्सच्या मीडिया रिपोर्टनुसार, स्विगीने ईमेलद्वारे यावर उत्तर देत सांगितलं की, स्विगीकडून सध्या कोणतीही नोकरकपात करण्यात येणार नाही, पण भविष्यात कर्मचाऱ्यांनी हटवण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


स्विगी (Swiggy) आधी झोमॅटो (Zomato) कंपनीनेही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं आहे. त्यानंतर आता स्विगी कर्मचाऱ्यांना हटवणार असल्याचं म्हटलं जात आहे. झोमॅटो (Zomato) 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची माहिती समोर आली होती.