Supersonic Cruise Missile Brahmos: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं, त्यानंतर पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं, याबाबत पंतप्रधान मोदींनी सोमवारी देशातील नागरिकांना संबोधित करताना स्पष्ट केले की अणु धमक्यांसह ब्लॅकमेलिंग आता चालणार नाही. ऑपरेशन सिंदूर सध्या थांबवण्यात आले आहे पण ते अजून संपलेले नाही. यासोबतच त्यांनी सिंधू पाणी करारावर हे देखील स्पष्ट केले की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेनंतर, 7 मे रोजी, भारतीय लष्कराच्या तीन शाखांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी छावण्यांवर आणि तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आणि ते उद्ध्वस्त केले. भारताच्या या मोठ्या निर्णयानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यास सुरुवात केली. पण कदाचित पहिल्यांदाच पाकिस्तानला भारतीय संरक्षण यंत्रणेची ताकद कळली. भारताची प्रतिकार संरक्षण व्यवस्था तोडणे सोपे नाही हे त्यांना समजले. यासोबतच, भारताने ज्या प्रकारे मेड इन इंडिया सुपरसॉनिक क्रूझ ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर दहशतवाद्यांना मारण्यासाठी आणि त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी केला, त्याची अचूकता देखील संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणारी आहे.
सुपरसॉनिक क्रूझ ब्रह्मोस क्षेपणास्त्राने दाखवली आपली ताकद
भारताच्या या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या सर्व हवाई संरक्षण यंत्रणांनाच चकमा दिला नाही तर त्यांचे प्रशिक्षण केंद्रही उद्ध्वस्त केले आणि संपूर्ण जगाला मेड इन इंडियाच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या हवाई तळाला लक्ष्य केले आणि ते उद्ध्वस्त केले. ब्राह्मोस हे भारताच्या संरक्षणाचे एक मोठे बळ आहे, जे रशिया आणि भारताने संयुक्तपणे विकसित केले आहे. याचे नाव भारताच्या ब्रह्मपुत्रा आणि रशियाच्या मोस्कोव्हस्क नद्यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे आणि त्याच्या निर्मीतीसाठी 250 दशलक्ष डॉलर्स खर्च आला आहे. भारतीय चलनात याचा एकूण खर्च 2,135 कोटी रुपये इतका आहे.
रशियाच्या सहकार्याने तयार केलं ब्राह्मोस
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मोसच्या उत्पादन युनिटची किंमत सुमारे 300 कोटी रुपये आहे आणि एका क्षेपणास्त्राची किंमत सुमारे 34 कोटी रुपये आहे. दरम्यान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या किंमतीबाबत कुठेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्याच्या रेंजबद्दल बोललो तर सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची रेंज सुमारे 290 किलोमीटर आहे. ॲडव्हान्स व्हर्जनची रेंज 500 वरून 800 किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र केवळ शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेला चकमा देण्यास सक्षम नाही तर क्षणार्धात लक्ष्य नष्ट करण्याची पूर्ण शक्ती देखील त्यात आहे. शिवाय, ब्राह्मोस क्षेपणास्त्र 200 ते 300 किलो स्फोटके वाहून नेण्यास पूर्णपणे सक्षम आहे.