Success Story : अलिकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी नोकरी सोडून वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत. या व्यवसायाच्या माध्यामातून लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. अशातच एका तरुणीने लाखो रुपयांची नोकरी सोडून एक व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून हा तरुण वर्षाला 2 कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. अनामिका श्रीवास्तव (Anamika Srivastava) असं या तरुणीचं नाव असून, हस्तकला वस्तू बनवण्याचा व्यवसाय आहे. 


भारतात मोठ्या प्रमाणात हस्तकला वस्तू वेगवेगळ्या राज्यांमध्ये पारंपारिक पद्धतीने तयार केल्या जातात. यामध्ये प्रत्येक राज्याचे एक वेगळेपण आहे. अनामिका श्रीवास्तव या तरुणीने असाच हस्तकला  वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. या तरुणाने बनवलेल्या वस्तू इतक्या आकर्षक आहेत की, त्याची कीर्ती केवळ राज्य किंवा देशापुरती मर्यादित नाही तर परदेशातील लोकांनाही या हस्तकला वस्तू आवडतात. काशिला लिव्हिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे. 


हस्तकलेच्या वस्तूंना परदेशातही मोठी मागणी 


नोएडा येथील अनामिका श्रीवास्तव यांनी एमबीएच शिक्षण घेतल्यानंतर एचआर मॅनेजरची नोकरी केली. मग काही वर्षानंतर त्यांनी लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून हस्तकला वस्तू तयार करण्याचा निर्णय घेतला. आज त्या डझनभर लोकांना रोजगार देण्यात यशस्वी ठरल्या आहेत.  अनामिकाने कोरोनाच्या संकटापूर्वीच छोटासा हस्तकला व्यवसाय सुरू केला होता, पण आज तिच्या उत्पादनांना देशातच नाही तर परदेशातही मागणी आहे. आज त्यांची वर्षभरात 2 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. 


कंपनीत कोणकोणत्या वस्तू बनवल्या जातात?


काशिला लिव्हिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, नोएडा सेक्टर 63, गौतम बुद्ध नगर, या ठिकाणी  हस्तकला वस्तू बनवते. महिला उद्योजिका अनामिका सांगते की कंपनीत कापडापासून विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. ज्यामध्ये उशा, गादी, टेबललिनन, किचनलिनन, पिशव्या, पडदे इत्यादी वस्तू बनवल्या जातात. ही सर्व उत्पादने हस्तशिल्प आहेत. या वस्तुंना युरोप, ऑस्ट्रेलिया, यूएसए आणि मध्य पूर्व मध्ये देखील मोठी मागणी आहे. तसेच घरुन काम करू इच्छिणाऱ्या महिलांनाही त्या रोजगार देतात. कंपनीत तीन ते चार डझन लोक काम करत आहेत.


कोरोनाच्या संकटात आल्या अडचणी


काशिला लिव्हिंग कंपनीच्या प्रमुख अनामिका श्रीवास्तव यांनी सांगितले की, आम्ही छोट्या स्तरापासून कामाला सुरुवात केली. आज चार ते पाच वर्षे झाली आहेत. हस्तकलेचे काम सुरु केल्यानंतर काही दिवसांनी कोरोनाचे संकट आले. त्यामुळं खूप अडचणी आल्याची माहिती श्रीवास्तव यांनी दिली. काही काळ असे वाटत होते की हे सर्व बुडेल, परंतु तसे झाले नाही आणि आज आमचा व्यवसाय चांगला असल्याची माहिती त्यांनी दिली.