Success story : आज आपण श्रेयन डागा (Shreyan Daga) यांची यशोगाथा पाहणार आहोत. अत्यंत लहान वयापासूनच त्यांनी उद्योजगतेच्या जगात पाऊल ठेवलं होतं. वयाच्या 8 व्या वर्षातच तो उद्योजकतेच्या क्षेत्रात उतरला होता. शाळेत असताना त्याने मुलांना 45 टक्के व्याजाने कर्ज देण्यास सुरुवात केली होती. वयाच्या फक्त 10 व्याच वर्षी त्याने वेबसाइट बनवली होती. तर वयाच्या 18 व्या वर्षी ते 6 कोटींच्या कंपनीचे मालक झाला होता. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती.
10वी नंतर शाळा सोडून स्टार्टअपमध्ये दिलं झोकून
यशस्वी होण्यासाठी वय नसते. श्रेयन डागाने हे सिद्ध केले आहे. ज्या वयात मुले खेळत होती त्या वयात डागाने पहिला पगार मिळवला होता. वयाच्या 3 ऱ्या वर्षापासून पेंटिंग करणारा श्रेयन हा वयाच्या 10 व्या वर्षी कोडिंग शिकून त्यांची पहिली वेबसाइटही तयार केली. यावेळी श्रेयनने आपली पहिली पेंटिंग विकून 9000 रुपये कमावले होते. श्रेयन गेल्या वर्षी शार्क टँक इंडियामध्येही दिसला होता. त्यानंतर तो शाळेत मुलांना कर्ज देत असे. कर्जावरील व्याजदर 40 ते 50 टक्के होता. डागा जेव्हा 13 वर्षांचा होता आणि 7 व्या वर्गात शिकत होता तेव्हा त्याने शेअर मार्केटमध्ये इंटर्नशिप सुरू केली. त्याचे वडीलही गुंतवणूकदार आहेत. त्यांनी आपल्या वडिलांकडून 2 लाख रुपये घेऊन एक स्टार्टअप सुरू केले. ते पैसे त्याला अनेक पटीने परत केले. डागा यांनी 10वी नंतर शाळा सोडली आणि स्वतःला त्याच्या स्टार्टअपमध्ये पूर्णपणे झोकून दिले.
डागाचे स्टार्टअप काय?
कोरोना महामारीच्या काळात, डागा यांना शिक्षकांना सत्यापित अभ्यासक्रम सुरू करण्यास मदत करण्याची कल्पना होती. हे अभ्यासक्रम मुलांना अभ्यासक्रमेतर उपक्रम म्हणून शिकवले जाणार आहेत. अभ्यासक्रमेतर असण्याबरोबरच भविष्यात हे अभ्यासक्रम मुलांना महत्त्वाचे कौशल्य म्हणून उपयुक्त ठरतील, असा दावा केला जात आहे. डागा हे ऑनलाइन लाइव्ह लर्निंग सेशनमध्ये शाळा आणि मुलांच्या पालकांना जोडायचे आणि त्यांची मुले भविष्याचा विचार करून कोणते कौशल्य विकास अभ्यासक्रम निवडू शकतात हे सांगायचे.
दर तासाला 2000 रुपयांची कमाई
प्रत्येक थेट सत्रात 5 ते 15 मुले असतात. त्याची फी 133 रुपये प्रति व्यक्ती आहे. जर एका सत्रात 15 लोक असतील तर त्यांना प्रत्येक सत्रातून सुमारे 2000 रुपये मिळतात. डागाची ही कल्पना शार्क टँकमध्येही आवडली होती. गेल्या वर्षी त्याला विनीता सिंग आणि पियुष बन्सल यांच्याकडून 5 टक्के इक्विटीवर 30 लाख रुपयांचा निधीही मिळाला होता. तेव्हा त्याच्या कंपनीचे मूल्यांकन 6 कोटी रुपये झाले होते.
महत्वाच्या बातम्या: