success story : अलीकडच्या काळात अनेक शेतकरी (Farmers) आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा (success story) पाहणार आहोत. उत्तर प्रदेशातील (UP) बलिया जिल्ह्यातील नवीन कुमार राय (Navin Kumar Roy) या शेतकऱ्याने आंबा पिकातून मोठं उत्पन्न घेतलं आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याचे शिक्षण फक्त 8 वी झालं आहे. तरीदेखील योग्य नियोजन करुन नवीन कुमार शर्मा यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. 


वार्षिक 8 ते 9 लाख रुपयांचे उत्पन्न


दरम्यान, उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात शेतकरी आंब्याची शेती करतात. येथील आंब्याच्या डझनभर जाती देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. बलिया जिल्ह्यातील 8 वी पास असेलेले शेतकरी नवीन कुमार राय यांनी विविध जातीच्या आंब्याची लागवड केलीय. यातून ते वार्षिक 8 ते 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. नवीन कुमार राय यांनी 5  वर्षांपूर्वी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर आंब्याचे झाडे लावली होती. आता त्या झाडाला चांगली फळे लागली आहेत. आता यातून वर्षानुवर्ष लाखो रुपयांचा नफा मिळणार आहे. 


वेळोवेळी खुरपणी आणि वेळेवर पाणी देणं गरजेचं


या आंब्याच्या झाडांची (Mango) जास्त काळजी घेण्याची गरज नसते. फक्त वेळोवेळी खुरपणी आणि वेळोवेळी थोडेसे पाणी द्यावे लागते अशी माहिती नवीन राय यांनी दिली. मी आंब्याच्या बागेला कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते वापरत नसल्याची माहिती राय यांनी दिली. त्यामुळं आंब्याचे फठ मोठे होते. तसेच फळातील गोडवा कायम राहत असल्याचे राय म्हणाले. 


हंगामात आंब्यापासून चांगला नफा  


शेतकरी नवीन कुमार राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दशहरी आंबा लोकांना खूप आवडतो. परंतू, आम्रपाली आंब्याचा गोडवाही त्या तुलनेत कमी नाही. आम्रपाली आंबा त्याच्या गोडपणामुळं खूप प्रसिद्ध आहे. बाजारात त्याची किंमत 150 ते 200 रुपये किलोपर्यंत पोहोचते. या हंगामात चांगला नफा मिळत अल्याची माहिती राय यांनी सांगितली. यावेळी फांद्या आंब्याच्या फळांनी भरलेल्या आहेत, त्यामुळे यंदा बंपर उत्पादन अपेक्षित असल्याची माहिती राय यांनी दिली. हे आंबे 12 ते 13 जून नंतर बाजारात येतील अशी शक्यता आहे. दरम्यान, नवीन शर्मा यांना आंबा लागडवडीची ट्रीक चांगली सापडली आहेत. ते सध्या लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


Unseasonal Rain : निसर्ग कोपला, हातातोंडाशी आलेलं घास निसटला, राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बळीराजा चिंतेत