Success Story : अलिकडच्या काळात अनेक तरुण चांगली नोकरी (Job) सोडून प्रयोगशील शेती करताना दिसत आहेत. तर काही तरुण वेगवेगळे व्यवसाय करताना दिसत आहेत. अशाच एका तरुणाने इंजिनियरिंगची नोकरी सोडून हैदराबादमध्ये देशी कोंबड्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. साकेश गौर असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने कंट्री चिकन कंपनीची स्थापना केली आहे. पाहुयात त्याची यशोगाथा.


आयआयटीमधून शिक्षण घेणे आणि अभ्यासानंतर चांगली नोकरी मिळवणे हे देशातील करोडो लोकांचे स्वप्न असते. पण काही लोक असेही असतात जे इतकं मिळवूनही यशाचा पाठलाग सोडत नाहीत. अशीच एक व्यक्ती म्हणजे कंट्री चिकन कंपनीचे संस्थापक साकेश गौर. त्याने भारतातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्था IIT मधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर 28 लाख रुपयांच्या पॅकेजवर एका टेक कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. पण त्याला स्वतःचे काहीतरी वेगळे काम करायचे होते. त्यासाठी तो संधी शोधत होता. अशातच त्याला दोन लोकांनी साथ दिली, हेंबर रेड्डी आणि मोहम्मद समीउद्दीन. 


हेंबर रेड्डी यांना कुक्कुटपालन व्यवसाय करायचा होता आणि त्याबाबत माहिती गोळा करत होते. यावेळी त्याची गौर आणि समुद्दीन यांची भेट झाली. यानंतर या तिघांनी कुक्कुटपालन व्यवसायाऐवजी मोठ्या प्रमाणावर कोंबडी विक्रीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे त्यांनी मांसाच्या विक्री करण्याचा निर्णय घेतला. हे काम करायचं ठरवल्याबरोबर सगळ्यात आधी नोकरी सोडली. 


70 जणांना रोजगार 


साकेश गौर आणि त्यांच्या मित्रांनी हैदराबादमधील कुकटपल्ली आणि प्रगतीनगर येथे भारतातील पहिले देसी चिकन रेस्टॉरंट उघडले. त्याने आपल्या कंट्री चिकन रेस्टॉरंटमध्ये 70 लोकांना काम दिले आहे. त्यांच्या गटाने दक्षिणेकडील राज्यातील 15,000 पोल्ट्री उत्पादकांशी संपर्क साधला आणि त्यांनी स्थानिक कोंबडीची पिल्ले शेतकऱ्यांकडून बाजारभावाने खरेदी करण्यास सुरुवात केली.


मेकॅनिकल इंजिनिअर ते उद्योजक 


साकेशने विविध क्षेत्रांमध्ये अनुभव मिळवला आहे. त्याने संपूर्ण भारतामध्ये संपर्क साधला आहे. कारण त्याने आजपर्यंत भारतातील 12 वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेतृत्व, पुरवठा साखळी, विपणन आणि व्यवसाय धोरणामध्ये त्यांचे कौशल्य विकसित केले आहे. 


शेतकऱ्यांना चांगला दर देऊन कोंबड्यांची खरेदी


कोंबडी आणि अंडी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खाद्यपदार्थ आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. अशात साकेशने उत्तम दर्जाची सेवा देण्याचे काम केले आहे.  त्यांच्या टीमने दक्षिणेकडील राज्यांमधील 15,000 पोल्ट्री फार्मर्ससोबत नेटवर्क तयार केले आहे. तो शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन देशी कोंबड्या खरेदी करत आहे.