Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला. तर, एनएसईचा 50 स्टॉकचा इंडेक्स निफ्टी 143.10 अंकांनी घसरला. शेअर बाजार सुरू होताच घसरण झाल्याने गुंतवणुकदरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.
प्री-ओपनिंगमध्ये बाजार कसा होता
आज, बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये, बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 175.98 अंकांनी किंवा 0.31 टक्क्यांनी घसरून 56,948.33 वर व्यवहार करताना दिसत आहे. निफ्टी 37 अंकांच्या घसरणीसह 16937.80 वर व्यवहार करताना दिसत आहे. याशिवाय SGX निफ्टीमध्येही 65 अंकांची घसरण झाली. आज बाजार स्थिरावण्यापूर्वीच बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
बाजारातील टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स
आज निफ्टीमधील वधारणाऱ्या स्टॉकची संख्या फक्त 7 असून 43 स्टॉक घसरले आहेत. निफ्टीमध्ये फार्मा शेअर्समध्ये तेजी दिसत आहे आणि औषध कंपनी सिप्लाचा शेअर दर 1.5 टक्के वधारला.
त्याशिवाय, सन फार्मा, पॉवर ग्रीड, एनटीपीसीच्या शेअर दरात वाढ झाली.
सर्वाधिक घसरण झालेले शेअर
शेअर बाजार सुरू होताच घसरण नोंदवण्यात आली. इंडसइंड बँक 4.71 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे आणि बजाज फायनान्स 1.79 टक्क्यांनी घसरला आहे. बजाज फिनसर्व्ह 1.46 टक्क्यांनी आणि आयशर मोटर्स 1.18 टक्क्यांनी घसरला आहे.
बँक निफ्टीमध्ये मोठी घसरण
बँकिंग स्टॉक्समध्ये झालेल्या घसरणीचा बाजारावर मोठा परिणाम झाला. बँक निफ्टीचे बहुतांश शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत आणि त्यात ३६४.५५ अंकांची किंवा १.०५ टक्क्यांची घसरण झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Year Ender 2021: यावर्षी पाच IPO ला 100 पट अधिक सबस्क्रिप्शन, पण 26 वर्ष जुना रेकॉर्ड कायम
- Government Scheme: या योजनेत खातं सुरू कराल तर पत्नीला मिळतील दरमहा 44,793 रुपये
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha