Sharekhan 5 Top Stocks to Buy : तुमच्या आजूबाजूला असे अनेकजण असतील जे दररोज ट्रेडिंग करून पैसे कमवतात. पण एखाद्या कंपनीत दीर्घकाळ गुंतवणूक करुनही तुम्हाला चांगला परतावा मिळवता येऊ शकतो. चांगले फंडामेंटल असलेल्या शेअरमध्ये पैसे टाकून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. हाच मुद्दा लक्षात घेऊन शेरखान (Sharekhan) या ब्रोकरेज फर्मने चांगली स्थिती असणाऱ्या पाच कंपन्या सुचवल्या आहेत. आगामी एका वर्षासाठी या कंपन्यात पैसे गुंतवल्यास  तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो, असा शेरखानचा अंदाज आहे.


शेरखानने अशा एकून पाच कंपन्यांना निवडले आहे. यामध्ये Can Fin Homes, Mrs. Bectors Food, Kirloskar Oil Engines, Tata Motors, ICICI Bank या बँकांचा समावेश आहे. शेअरखानच्या मतानुसार वर्षभरात हे स्टॉक्स 30 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स देऊ शकतात. 


Can Fin Homes


Sharekhan च्या म्हणण्यानुसार Can Fin Homes या शेअरमध्ये 12 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करायला हवी. ही गुंतवणूक करताना टार्गेट प्राईज प्रति शेअर 1050 रुपये असायला हवे. 25 जून 2024 रोजी या शेअरचे मूल्य 898 रुपये होते. म्हणजेच या दरानुसार 12 महिन्यांच्या कालावधीत हा स्टॉक तुम्हाला 17 टक्क्यांनी रिटर्न्स देऊ शकतो, असे शेरखानचे मत आहे. 


Mrs. Bectors Food 


Sharekhan ने Mrs. Bectors Food या कंपनीतही गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही या कंपनीचे शेअर खरेदी केल्यावर टार्गेट प्राईज 1705 रुपये ठेवावे, असा सल्ला शेरखानने दिलाय. 25 जून 2024 रोजी या शेअरचे मूल्य1406 रुपये होते. या मूल्यानुसार वर दिलेल्या टार्गेटशी तुलना केल्यास तुम्हाला हा शेअर 21 टक्क्यांनी रिटर्न्स देऊ शकतो.


Kirloskar Oil Engines 


Sharekhan ने Kirloskar Oil Engines या कंपनीतही गुंतवणूक करावी, असे सांगितले आहे. 12 महिन्यांच्या कालावधीत या शेअरचे टार्गेट 1593 रुपये ठेवावे, असे शेरखानने सुचवले आहे. 25 जून 2024 रोजी या शेअरचे मूल्य 1376 रुपये होते. सध्याचे शेअरचे मूल्य आणि शेरखानने दिलेले टार्गेट याचा विचार करता वर्षभरात तुम्हाला 16 टक्के रिटर्न्स मिळू शकतात. 


Tata Motors 


Sharekhan ने Tata Motors या कंपनीतही आगामी एका वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलाय. ही गुंतवणूक करताना 1235 रुपयांचे टार्गेट ठेवावे असे शेरखाने म्हटलंय. 25 जून 2024 रोजी या शेअरचा भाव 955 रुपये होता. या भावानुसार आगामी वर्षभरात ही कंपनी 30 टक्क्यांनी रिटर्न्स देऊ शकते.


ICICI Bank 


Sharekhan ने ICICI Bank बँकेतही गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलाय. 12 महिन्यांसाठी गुंतवणूक करताना हा टार्गेट प्राईज 1300 रुपये ठेवायला हवी. 25 जून 2024 रोजी या शेअरचा दर 1204 रुपये होता. त्यानुसार एका वर्षात ही कंपनी साधारण 8 टक्क्यांनी रिटर्न्स देऊ शकते. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


 Mutual Fund : म्युच्यूअल फंड म्हणजे नेमकं काय रे भाऊ? जाणून घ्या A 'टू Z माहिती!


घर खरेदी करणाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता


सोनं खातंय भाव! कधीकाळी 63 रुपयांत यायचं एक तोळा सोनं, आज थेट 71 हजारांच्या पुढे