Stock Market Opening: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या व्यापार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराची (Indian Stock Market) सुरुवात चांगली झाली आहे. बँकिंग आणि ऑटो शेअर्सच्या तेजीमुळे आज देशांतर्गत शेअर बाजार तेजीत आहे. महावीर जयंतीनिमित्त 4 एप्रिल रोजी शेअर बाजाराला सुट्टी असल्यानं हा व्यापारी आठवडा छोटा असेल. 


बाजार उघडताच काय परिस्थिती? 


नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, बीएसईचा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) 139.64 अंकांच्या म्हणजेच, 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 59,131.16 वर उघडला. यासह, NSE चा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी (Nifty) 68.20 अंकांच्या म्हणजेच, 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 17,427.95 वर उघडला.


सेन्सेक्स आणि निफ्टी शेअर्सची स्थिती


सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स तेजीसह तर 12 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. दुसरीकडे, NSE च्या निफ्टीच्या 50 पैकी 30 शेअर्स तेजीनं व्यवहार करत आहेत तर 20 शेअर्स घसरल्याचं पाहायला मिळतंय.  


सेक्टोरल इंडेक्सची परिस्थिती काय?  


सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर, आज एफएमसीजी, आयटी आणि मेटल शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. वाढत्या सेक्टरमध्ये ऑटो शेअर्समध्ये 1.42 टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे. बँक निफ्टीमध्येही आज तेजी पाहायला मिळत आहे. मीडिया शेअर्स 0.6 टक्क्यांच्या मजबूतीसह व्यवहार करत आहेत.


कोणते शेअर्स तेजीत? 


मारुती सुझुकी, भारती एअरटेल, एनटीपीसी, एम अँड एम, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एल अँड टी, कोटक बँक, विप्रो, अॅक्सिस बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, पॉवरग्रीड, टाटा स्टील, इंडसइंड बिझनेस हे सेन्सेक्स वाढले आहेत. बँक, टायटनच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.


प्री-ओपनिंगमध्ये परिस्थिती काय होती? 


आज, प्री-ओपनिंगमध्ये, NSE चा निफ्टी 87.70 अंकांच्या म्हणजेच 0.51 टक्क्यांच्या वाढीसह 17447.45 च्या स्तरावर दिसत होता. BSE चा सेन्सेक्स आज 201.23 अंकांच्या म्हणजेच, 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 59192.75 च्या पातळीवर व्यवहार करत होता.


Dollar vs Rupee : रुपयाची घसरणीसह सुरुवात 


अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 29 पैशांनी कमकुवत झाला. आज रुपया 82.17 च्या तुलनेत 82.45 प्रति डॉलरवर उघडला.


आशियाई बाजारात संमिश्र कल


आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. SGX निफ्टी 0.17 टक्के, निक्‍केई 225 0.39 टक्के आणि स्ट्रेट टाइम्स 0.76 टक्क्यांनी वाढले आहेत. तर हँगसेंगमध्ये 0.13 टक्के कमजोरी आहे. तैवान वेटेड 0.12 टक्क्यांनी मजबूत झाला आहे, तर कोस्पी 0.16 टक्के कमजोरी दाखवत आहे. शांघाय कंपोझिटमध्ये 0.48 टक्क्यांची वाढ आहे.