शेअर बाजार का वधारला?
जागतिक बाजारापेक्षा भारतीय बाजाराला आज चांगले संकेत मिळाले होते. तसेच अमेरिका आणि आशियाई बाजार वधारल्यामुळे भारतीय बाजारात त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळाला. त्यामुळेच सेन्सेक्स आणि निफ्टीच्या अंकात वाढ झालेली पाहायला मिळाली.
दिवसाच्या सुरुवातीला असा सुरु झाला कारभार
आज दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सने 30 हजरांचा आकडा पार केला होता. तसेच 840.25 अंकांनी वधारत 30,734 अंकांनी शेअर बाजाराला सुरुवात झाली. तर एनएसईच्या निफ्टी 50 ची सुरुवात 246.35 अकांनी होत 8,995 वर गेला. आज निफ्टी 9032.55 अंकानी वधारला.
VIDEO | Coronavirus | कोरोनामुळे जगभरात सर्वात मोठी आर्थिक मंदी : आयएमएफ
अमेरिकेच्या बाजारात उसळी
अमेरिकेच्या बाजारात काल चांगला वधारल्यामुळे अमेरिकेत डाऊ मार्केट 780 अंकांनी वधारत बंद झाला. काल झालेल्या ट्रेडींगमुळे एसएंडपी 500 आणि नैस्डेक 3 टक्क्यांनी वधारले होते.
दरम्यान जागतिक बाजारातील घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम गेले काही दिवस पाहायला मिळत होता. अमेरिकेत डाऊ मार्केटमध्ये दिवसभरातील सर्वात मोठी घसरण झाली होती. तर जपानच्या निक्केई मार्केट 2.5 टक्के घसरण झाली होती. करोनोमुळे जुलै ऑगस्टमधील ऑलंम्पिक रद्द झाल्याने बाजार घसरला होता. पण आज पाहायला मिळालेल्या बाजारातील तेजीमुळे समाधानाचे वातावर आहे.