जगभरात मृत्यूतांडवासाठी कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरसनं आता अर्थव्यवस्था पोखरायला सुरुवात केली आहे. जगभरातल्या शेअर बाजाराप्रमाणे भारतीय शेअर बाजार गेले काही दिवस कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. आज मात्र शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली.
शेअर बाजारात तेजी
आज सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारलेला पाहायला मिळाला. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 962.06 अंकांनी म्हणजेच 3.07 टक्क्यांनी वधारत 32,333.18 वर बाजाराला सुरुवात झाली. सुरुवातील निफ्टीमध्ये 315.85 अंकांनी म्हणजे 3.43 टक्क्यांनी वधारत 9512 वर बाजाराला सुरुवात झाली.
निफ्टीमध्ये प्रचंड तेजी
आज बाजारात निफ्टीमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली. निफ्टी 50 मधील 49 शेअर्स बाजारात हिरव्या निशाणीसह व्यापार करीत होते. केवळ नेस्लेच्या शेअर्समध्ये 0.43 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली.
निफ्टीचे वधारलेले शेअर्स
- वेदांता 10 टक्के
- आयसीआयसीआय बँक 8 टक्के
- मारुती 7.12 टक्के
- इंडसलंड बँक 6.76 टक्के
- अॅक्सिस बँक 6.48 टक्के
Stock Market | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी
काल सेन्सेक्स 190.10 अकांनी म्हणजे 0.60 टक्क्यांनी घसरण होत 32,371 वर जाऊन बंद झाला. तर निफ्टी50 मध्येही 42.65 अकांनी म्हणजे 0.46 टक्क्यांची घसरण होत 9196.55 वर बंद झाला.
दरम्यान जागतिक बाजारातील घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम गेले काही दिवस पाहायला मिळत होता. अमेरिकेत डाऊ मार्केटमध्ये दिवसभरातील सर्वात मोठी घसरण झाली होती. पण आज पाहायला मिळालेल्या भारतीय बाजारातील तेजीमुळे समाधानाचे वातावरण पसरले आहे.