Share Market Holiday:  आजपासून नवीन वर्ष सुरू झाले आहे. मागील वर्षात शेअर बाजारात (Share Market) अनेक चढ-उतार आले होते. सेन्सेक्स (BSE Sesnsex), निफ्टीनेदेखील (NSE Nifty) उच्चांक गाठले होते. या वर्षात शेअर बाजारातून चांगला परतावा मिळेल अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे. शेअर बाजारात तुम्ही गुंतवणूक, ट्रेडिंग (Investment and Trading In Share Market ) करत असाल तर तुम्हाला कोणत्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहार बंद असणार याची माहिती असणे आवश्यक आहे. साप्ताहिक सुट्टीशिवाय, शेअर बाजारात इतर काही दिवस व्यवहार बंद असतात. 

या दिवशी शेअर बाजारातील व्यवहार राहणार बंद

भारतीय स्टॉक एक्स्चेंजने 2023 (New Year 2023) साठी त्यांच्या सुट्ट्यांची यादी (Share Market Holiday 2023) जारी केली आहे. या यादीनुसार 2023 मध्ये वीकेंडच्या सुट्ट्या वगळता 15 दिवस शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. जानेवारी महिन्यातील पहिली सुट्टी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असेल. याशिवाय होळी, रामनवमी, दिवाळी या सणांमुळे शेअर बाजारही बंद राहणार आहे.

शेअर बाजारातील 2023 मधील सुट्ट्या

26 जानेवारी 2023 - प्रजासत्ताक दिन7 मार्च 2023 - होळी30 मार्च 2023 - राम नवमी4 एप्रिल 2023 - महावीर जयंती7 एप्रिल 2023 - गुड फ्रायडे14 एप्रिल 2023 -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती1 मे 2023 - महाराष्ट्र दिन28 जून 2023 - बकरी ईद15 ऑगस्ट 2023 - स्वातंत्र्य दिन19 सप्टेंबर 2023 - गणेश चतुर्थी2 ऑक्टोबर 2023 - गांधी जयंती24 ऑक्टोबर 2023 - दसरा 14 नोव्हेंबर 2023 - दिवाळी27 नोव्हेंबर 2023 - गुरु नानक जयंती25 डिसेंबर 2023 - ख्रिसमस

या दिवशी होणार मुहूर्त ट्रेडिंग 

भारतीय शेअर बाजारात दिवाळीतील लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने विशेष मुहूर्त ट्रेडिंग केली जाते. लक्ष्मी पूजन पार पडल्यानंतर शेअर बाजारात फक्त एक तासासाठी व्यवहार होतात. या दिवशी होणारे व्यवहार, खरेदी केले जाणारे शेअर्स हे लाभदायी ठरतात असा अनेकांचा समज आहे. यंदाच्या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग 14 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती शेअर बाजाराकडून एका परिपत्रकाद्वारे देण्यात येईल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: