मुंबई : आठवड्यातील व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी भारतीय शेअर बाजार (Share Market) गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक राहिला. अमेरिकेत आज होणाऱ्या फेडरल  रिझर्व्ह बैठकीच्या आधी भारतीय शेअर बाजार दबावात दिसला. त्याच्या परिणामी आज, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 365.83 अंकांनी घसरत 64,886 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 121 अंकांनी घसरून 19,265 अंकांवर स्थिरावला.

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार 

आजच्या व्यवहारात बँकिंग सेक्टरमधील शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसून आला. बँक निफ्टी 265 अंकांच्या घसरणीसह 44,231 अंकांवर बंद झाला. एफएमसीजी सेक्टरचा निर्देशांक 529 अंकांनी घसरून बंद झाला. याशिवाय ऑटो, आयटी, फार्मा, मेटल, एनर्जी, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरचे शेअर्स घसरले. मिड कॅप निर्देशांक 0.82 टक्क्यांनी आणि स्मॉल कॅप 0.41 टक्क्यांनी घसरला. 

सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 9 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ नोंदवण्यात आली. 

आज दिवसभरातील व्यवहारात बजाज फिनसर्वमध्ये 2.40 टक्के, एशियन पेंट्समध्ये 1.04 टक्के, बजाज फायनान्समध्ये 1.04 टक्के, ओएनजीसीमध्ये 0.92 टक्क्यांच्या तेजीसह स्थिरावले. तर, डॉ. रेड्डी 2.17 टक्के, अदानी पोर्ट्समध्ये 1.92 टक्के, जेएसडब्लू स्टीलमध्ये 1.87 टक्के, लार्सनच्या शेअर दरात 1.85 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

इंडेक्‍स किती अंकांवर स्थिरावलादिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex64,886.5165,106.0064,732.57-0.56%
BSE SmallCap36,055.9636,251.1235,829.35-0.24%
India VIX12.0812.249.983.27%
NIFTY Midcap 10038,471.2538,805.8038,385.15-0.82%
NIFTY Smallcap 10011,869.4511,954.8011,786.45-0.41%
NIfty smallcap 505,434.805,458.905,377.25-0.05%
Nifty 10019,193.9019,278.5019,162.70-0.67%
Nifty 20010,254.4510,305.5010,237.00-0.69%
Nifty 5019,265.8019,339.5519,229.70-0.62%

गुंतवणूकदारांच्या दोन लाख कोटींचा चुराडा 

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांचे बाजार भांडवल, आजच्या व्यवहाराच्या दिवशी 306.55 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. आधीच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवार, 24 ऑगस्ट रोजी बाजार भांडवले 308.67 लाख कोटी रुपये होते. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्याचे बाजार भांडवल आज दोन लाख 12 हजार कोटींनी घसरले. 

2145 कंपन्यांचे शेअर दर घसरले 

मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) आज तेजीपेक्षा घसरणीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक आहे. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,763 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,494 कंपन्यांचे शेअर्स वधारत बंद झाले. त्याच वेळी, 2,145 कंपन्यांच्या शेअर दरात  घसरण दिसून आली. तर 124 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. त्याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 197 कंपन्यांच्या शेअर दरांनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 20 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांच्या नीचांकाला स्पर्श केला.

इतर महत्त्वाची बातमी :