मुंबई: शेअर बाजारात या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. शेअर बाजारातील आजची तेजी ही अखेरच्या शेवटच्या एका तासात दिसून आली. एफएमसीजी (FMCG Sector) आणि फार्मा स्टॉक्समध्ये (Pharma Stocks) खरेदीचा जोर दिसून आल्याने बाजारात तेजी दिसून आली. आज दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 100 अंकांच्या तेजीसह 65,880 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 36 अंकांच्या तेजीसह 19,611 अंकांवर स्थिरावला. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार

आज दिवसभरातील व्यवहारात फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, मीडिया, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी दिसून आली आहे.  तर, आयटी (IT), बँकिंग (Bank Nifty), मेटल्स, रिअल इस्टेट या सेक्टरमधील स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील शेअर्समध्ये आजही खरेदीचा जोर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 15 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी 50 मधील 29 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. 

इंडेक्‍स किती अंकांवर बंद झालादिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex65,880.5265,971.1365,488.0300:02:10
BSE SmallCap37,948.6138,142.3437,855.55-0.04%
India VIX10.6810.989.81-1.27%
NIFTY Midcap 10040,284.1040,377.3040,154.800.08%
NIFTY Smallcap 10012,674.9012,721.4512,621.050.15%
NIfty smallcap 505,825.455,858.605,798.60-0.09%
Nifty 10019,578.2519,599.9519,464.100.24%
Nifty 20010,500.8510,511.0510,444.950.22%
Nifty 5019,611.0519,636.4519,491.500.18%

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 6 सप्टेंबर रोजी 317.36 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. आधीच्या दिवशी म्हणजे मंगळवार, 5 सप्टेंबर रोजी बाजार भांडवल हे 316.64 लाख कोटी रुपये होते. आज बाजारात दिसून आलेल्या तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 72 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. 

1955 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ

आजच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी बहुतांशी कंपन्यांच्या शेअर दरात वाढ दिसून आली. आज बीएसईमधील 3791 कंपन्यांच्या शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी 1955 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ दिसून आली. तर, 1682 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली.  154 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. 

आजच्या व्यवहारात 287 कंपन्यांनी त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 13 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा नीचांक दर गाठला. आज 13 कंपन्यांच्या शेअर दरांनी अप्पर सर्किट गाठले. तर, 7 कंपन्यांच्या शेअर दराने लोअर सर्किट गाठले. 

इतर महत्त्वाची बातमी :