State Bank of India नवी दिल्ली: तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेनं त्यांच्या ग्राहकांसाठी एक अपडेट शेअर केली आहे. त्यानुसार 7 सप्टेंबर 2025 म्हणजेच उद्या स्टेट बँक ऑफ इंडियाची इंटरनेट बँकिंग, योनो ऐप, योनो लाइट, योनो बिझनेस ( वेब आणि मोबाईल)च्या सेवा बंद राहणार आहेत. याशिवाय CINB सारख्या काही सेवा देखील अस्थायी रुपयात बाधित असतील. ग्राहकांनी एक तासाच्या कालावधीत होणारा त्रास टाळण्यासाठी डाऊनटाईम पूर्वी व्यवहार करावेत.
सेवा किती कालावधीसाठी बंद राहणार?
भारतीय स्टेट बँकेनं दिलेल्या माहितीनुसार इंटरनेट बँकिंग योनो, योनो लाइट, योनो बिझनेस (वेब आणि मोबाईल) CINB आणि मर्चंट सेवा 7 सप्टेंबर 2025 ला दुपारी 1 वाजून 20 मिनिटे ते 2 वाजून 20 मिनिटे या एका तासासाठी बंद राहतील. या एका तासात मेन्टनेन्सचं काम सुरु राहील. स्टेट बँकऑफ इंडियाच्या माहितीनुसार या कामामुळं इंटनेंट बँकिंग, रिटेल, मर्चेंट, योनो लाईट, सीआयएनबी, योनो बिझनेस वेब आणि मोबाईल ॲप, योनोच्या सेवा 7 सप्टेंबर 2025 ला भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.20 ते दुपारी 2.20 दरम्यान उपलब्ध नसतील. या दरम्यान यूपीआय लाईट आणि एटीएम सेवा सुरु असतील. कोणत्याही त्रासापासून वाचण्यासाठी डाऊन टाईम पूर्वी कामं पूर्ण करुन घ्यावीत.
SBI YONO म्हणजे काय?
योनो (यू ओन्ली नीड वन) हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. हे ॲप बिल पेमेंट पासून शॉपिंग, विमा, गुंतवणूक यासारख्या सेवांसाठी वन स्टॉप सोल्यूशन आहे. तुम्ही योनो ॲप द्वारे तुमचं बँक खातं मॅनेज करु शकता, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करु शकता, बिल पेमेंट करु शकता. याशिवाय काही नॉन बँकिंग सेवांचा लाभ देखील घेता येतो. सरकारी योजनांसाठी अर्ज देखील करता येतो. काही वेळा शॉपिंग केल्यास रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतात. बँकेत न जाता देखील योनोच्या माध्यमातून वित्तीय कामं करु शकतात.