Smart TV GST Offers : भारतीय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने स्मार्ट टीव्हीच्या डिस्प्लेवरील वस्तू व सेवा कर (GST) 28 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी केल्यामुळे देशभरातील नामवंत ब्रँड्सनी त्यांच्या स्मार्ट टीव्ही मॉडेल्सच्या किंमतीत हजारो रुपयांची घसरण जाहीर केली आहे.

Continues below advertisement

थॉमसन, सोनी, एलजी आणि सॅमसंगसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सूट दिली असून, आता 24 इंचाच्या एंट्री-लेव्हल स्मार्ट टीव्हीची सुरुवातीची किंमत फक्त 5799 रुपये इतकी झाली आहे. यामुळे दिवाळी आणि सणासुदीच्या सेलमध्ये खरेदीदारांसाठी आणखी फायद्याची ठरणार असून, यामुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरील विक्रीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थॉमसन ब्रँडकडून सर्वाधिक कपात

भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय ब्रँड Thomson ने त्यांच्या विविध मॉडेल्सच्या किंमतीत मोठी घट केली आहे. 22 सप्टेंबरपासून नवीन किंमती लागू होणार असून Flipkart आणि Amazon सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर यावर विशेष ऑफर्स उपलब्ध असतील.

Continues below advertisement

Thomson स्मार्ट टीव्ही नवीन किंमती (पूर्वीच्या किंमतींसह) :

24-inch Smart TV – आता 5799 रुपये (पूर्वी 6499 रुपये) – 700 रुपये सूट

32-inch Smart TV – आता 7999 रुपये (पूर्वी 8999 रुपये) – 1000 रुपये सूट 

40-inch Smart TV – आता 11999 रुपये (पूर्वी 13999 रुपये) – 2000 रुपये सूट

43-inch Smart TV – आता 13499 रुपये (पूर्वी 15999 रुपये) – 2500 रुपये सूट

50-inch Smart TV – आता 20999 रुपये (पूर्वी 24999 रुपये) – 4000 रुपये सूट

55-inch Smart TV – आता 27999 रुपये (पूर्वी 32999 रुपये) – 5000 रुपये सूट

65-inch Smart TV – आता 38999 रुपये (पूर्वी 45999 रुपये) – 7000 रुपये सूट

75-inch QD Mini Smart TV – आता 84999 रुपये (पूर्वी 99999 रुपये) – 15000 रुपये सूट

Sony, LG, Samsung कडूनही मोठ्या सवलती

प्रीमियम ब्रँड Sony ने त्यांच्या संपूर्ण रेंजमध्ये 5 टक्के ते 10 टक्के किंमत कपात जाहीर केली आहे. LG आणि Samsung ने देखील प्रतिसाद देत त्यांच्या स्मार्ट टीव्हींच्या किंमती कमी केल्या आहेत, ज्यामुळे बाजारात स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे.

ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

GST दर कपातीमुळे आता स्मार्ट टीव्ही अधिक परवडणारे झाले आहेत. 4K रिझोल्यूशन, व्हॉईस कंट्रोल, स्मार्ट अ‍ॅप्ससारखे हाय-टेक फीचर्स असलेले मोठ्या स्क्रीनचे मॉडेल्स देखील 1000 ते 15000 रुपयांपर्यंत स्वस्त होत आहेत. दिवाळी सेलमध्ये ही सूट आणखी आकर्षक स्वरूपात उपलब्ध होणार असल्यामुळे ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.

आणखी वाचा 

तूप, बटर ते आईस्क्रीमपर्यंत, मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, 700 हून अधिक उत्पादनांच्या किंमी कमी, ग्राहकांना दिलासा