नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचे दर वाढल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण झाली आहे. तर, सोन्याचे दर देखील घसरले आहेत. सोन्याच्या एका तोळ्याच्या दरात 1648 रुपयांची घसरण झाली आहे.
सोने आणि चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 डिसेंबरच्या एक्सपायरीच्या वायद्याचे 24 कॅरेट सोन्याचे दर 132294 रुपयांच्या तुलनेत 8009 रुपयांनी घसरले आहेत. शुक्रवारी सोन्याचा एका तोळ्याचा दर 124195 रुपयांवर आहे. देशांतर्गत बाजारात या आठवड्यात सोन्याचे दर घसरले आहेत.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेले सोन्याचे दर पाहिले असता दिसून येतं की पाच दिवसांमध्ये सोन्याचे दर 1648 रुपयांनी घसरले आहेत. 14 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 124794 रुपयांवर बंद झाला होता. 21 नोव्हेंबरला सोन्याचा दर 123146 रुपयांवर आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 120190 रुपये एक तोळा, 20 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 109600 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा एखा तोळ्याचा दर 99750 रुपये तर 14 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 79430 रुपयांवर आहे.
आयबीजेएच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेले सोन्याचे दर देशभर सर्वक्ष सारखेच असतात. प्रत्येक शहरात सोन्याचे दर एक ते दोन हजार रुपयांनी वेगळे असू शकतात. सोन्यावर 3 टक्के जीएसटी आकारला जातो.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी क्रॅश
सोन्याप्रमाणं चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. कमोडिटी एक्सचेंज ते देशांतर्गत बाजारात चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एक किलोच्या चांदीच्या वायद्याचे दर 14 नोव्हेंबरला 156018 रुपयांवर होते. ते, शुक्रवारी 21 नोव्हेंबरला 154052 रुपयांवर आले. या हिशोबानं चांदीचे दर 1966 रुपयांनी घसरले आहेत.
देशांतर्गत बाजाराचा विचार केल्यास 14 नोव्हेंबरला चांदीचे दर 159367 रुपये होते. तर, 21 नोव्हेंबरला दर 151375 रुपयांवर आले होते. त्या हिशोबानं चांदीचे दर 8238 रुपये एक किलो होते.