Share Market Updates : शेअर बाजारात आज मोठी पडझड दिसून आली. बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच सेन्सेक्स 54, 000 अंका खाली आला. तर, एनएसई निर्देशांक निफ्टीदेखील 1.7 टक्क्यांनी घसरला आहे.  जागतिक शेअर बाजारातही घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. 


शेअर बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्स 53,070 अंकावर खुला झाला. तर, निफ्टीची सुरुवात 15,917 च्या पातळीवर झाली. बाजार सुरू होताच काही वेळातच सेन्सेक्समधील घसरण वाढत गेली. शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू असल्याने बाजार आणखी घसरण्याची शक्यता आहे. 


15 मिनिटांत 1000 अंकाची घसरण 


सेन्सेक्स सकाळी 9 वाजून 33 मिनिटाच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 1,037.59 अंकाची घसरण होत निर्देशांक 53,170 अंकावर व्यवहार करत आहे. त्याशिवाय निफ्टीदेखील 16000 हजार अंकाखाली व्यवहार करत आहे. निफ्टीमध्ये 298.65 अंकाची घसरण नोंदवण्यात आली. 


निफ्टी50 मधील दोन कंपन्यांचे शेअर वधारले असून इतर शेअर्स कोसळले आहेत. बँक निफ्टीतही मोठी घसरण झाली आहे. बँक निफ्टीत 732 अंकानी कोसळला असून 2.14 टक्क्यांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी 33431 अंकावर व्यवहार करत आहे. 


अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड


वाढत्या महागाईच्या भीतीने अमेरिकन शेअर बाजारात बुधवारी मोठी पडझड झाली. जून 2020 नंतर ही सर्वात मोठी पडझड आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 


निफ्टीत घसरण


निफ्टीमध्ये टेक महिंद्राचा शेअर दर 4.5 अंकानी घसरला आहे. तर, इन्फोसिसमध्ये 4.13 टक्क्यांची घसरण दिसत आहे. विप्रो 3.52 अंकांनी घसरला आहे. इंडसइंड बँकेत 3.42 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. टीसीएसमध्ये 3.42 टक्क्यांनी घसरण दिसत आहे. तर, आयटीसीचा शेअर दर वधारला आहे. आयटीसीचा शेअर दर 3.88 टक्क्यांनी वधारला आहे.


दरम्यान, बुधवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 109 अंकानी, तर निफ्टीही 19 अंकानी घसरला. बुधवारी 1865 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. तर 1409 शेअर्समध्ये घसरण झाली. 108 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.   BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही 0.3 टक्क्यांची घसरण झाली आहे.