Share Market Updates : शेअर बाजाराची आज चांगली सुरुवात झाली. प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला. बाजार सुरू होताच विक्रीमुळे घसरण सुरू झाली. मात्र, काही वेळेतच खरेदी वाढल्याने बाजार वधारू लागला. 


एनएसईचा निफ्टी 17,045 अंकावर सुरू झाला होता. मंगळवारी निफ्टीची 17000 अंकाखाली घसरण झाली. आज बाजारात व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा तेजी आली. बाजार सुरू झाल्यानंतर निफ्टीत घसरण झाली. मात्र, काही वेळेतच 100 अंकानी निफ्टी वधारला.  


निफ्टीतील 50 पैकी 36 स्टॉक्समध्ये वधारले असल्याचे दिसून आले. तर, उर्वरीत 14 शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. बँक निफ्टीत घसरण दिसून आली. बँक निफ्टीत 119 अंकाची घसरण होऊन 36,221 अंकावर व्यवहार करत होता. 







रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर दराने पुन्हा उच्चांक गाठला आहे. याचे बाजार भांडवल 18 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. दोन दिवसात रिलायन्सच्या शेअर दरात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. 



आयशर मोटर्सच्या शेअर दरात 4.20 टक्क्यांची उसळण दिसून आली. त्याशिवाय कोल इंडियाचा शेअर दर 3.21 टक्क्यांहून अधिक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 2.58 टक्के आणि टाटा मोटर्समध्ये 2.58 टक्क्यांची तेजी दिसत आहे. मारुतीचा शेअर 2.51 टक्क्यांनी वधारला आहे. 


कोटक महिंद्रा बँकेत 1.27 टक्क्यांची घसरण दिसत असून अपोलो रुग्णालयाच्या शेअर दरात 1.06 टक्क्यांनी घसरला आहे. 'एल अँड टी'च्या शेअर दरात 0.85 टक्के आणि इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 0.81 टक्क्यांची घसरण झाली आहे. बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर्वच्या शेअर दरात 0.7 टक्क्यांची घसरण दिसत आहे.  


दरम्यान, मंगळवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 703 अंकांनी घसरला होता. तर, निफ्टीही 215 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.23 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,463 वर पोहोचला आहे. तर, निफ्टीमध्ये 1.25 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,958 वर पोहोचला. 16 मार्च 2022 नंतर पहिल्यांदाच निफ्टी हा 17 हजारांखाली आला.