Share Market Updates : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शक्तिकांत दास आज पतधोरण जाहीर करणार आहेत. त्यांच्या घोषणेच्या आधीच शेअर बाजारात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स वधारला असल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 344 अंकांनी वधारत 58,810 अंकांनी तर, निफ्टी 90 अंकांच्या तेजीने 17554 अंकावर सुरू झाला. 

एसजीक्स निफ्टीदेखील शेअर बाजार वधारणार असल्याचे संकेत देत होता. आयटी, मेटल्स, मीडिया एनर्जी या क्षेत्रांमध्ये वाढ होताना दिसत आहे, तर तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी बँकिंग, वित्तीय सेवा, फार्मा क्षेत्र याशिवाय स्मॉल कॅप आणि मिड-कॅप शेअर्समध्ये घसरण होत आहे. बीपीसीएल, एशियन पेंट, आयसीआयसीआय बॅंक, कोल इंडिया आणि आयटीसीमध्ये बाजार उघडता घसरण झाल्याचे दिसून आले. 

 

रिझर्व्ह बँकेचे आज पतधोरण जाहीर होणार

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीने गाठलेला उच्चांक आणि वाढती महागाई या पार्श्वभूमीवर आज रिझर्व्ह बँक पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँक आपल्या पतधोरणात व्याजदर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

रेपो दरामध्ये बदल?

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर स्थिर ठेवण्यात येण्याची शक्यता असून रिर्व्हस रेपो दरात बदल होण्याची दाट शक्यता आहे. डिसेंबरमधील पतधोरणात रिझर्व्ह बँकेने  रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवला होता. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha