Share Market Opening : शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण दिसून आली. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सममध्ये 250 अंकांची घसरण दिसून आली. अमेरिकेत मध्यवर्ती बँकेकडून व्याज दर वाढवण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात मोठा दबाव निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या परिणामी शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकदारांकडून सपाट्याने विक्री सुरू आहे. 


सोमवारी प्री-ओपन सत्रापासूनच शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 250 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टीमध्ये 0.44 टक्क्यांनी घसरण होत 17,550 अंकांवर बाजार सुरू झाला. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 517.42 अंकांनी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 58,499 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 193 अंकांची घसरण दिसून आली. निफ्टी 17,422 अंकावर व्यवहार करत होता. 


मागील आठवड्यातही सेन्सेक्समध्ये 2000 अंकांची घसरण दिसून आली. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 427.44 अंकांनी घसरला होता. तर, निफ्टीमध्ये 139.85 अंकांची घसरण दिसून आली. 







अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह बँक व्याज दर वाढवण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यात फेडरल बँकेची महत्त्वाची बैठक होणार आहे. बुधवारी समारोप होणाऱ्या या बैठकीत व्याज दर वाढवण्यात येण्याचे संकेत मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणुकदारांकडून शेअर बाजारात विक्री करण्यात येत आहे. भारतीय शेअर बाजारात हाच कल दिसून येत आहे. शुक्रवारी परदेशी गुंतवणुकदारांनी 3148.58 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.  


आशियाई बाजारांची स्थिती


आशियाई शेअर बाजारात आज घसरण दिसून आली. जपानचा निक्केई निर्देशांकात 150 अंकांची घसरण दिसून आली. तैवान आणि हँगसेंगमध्ये घसरण दिसून आली. SGX निफ्टी 116 अंकांच्या घसरणीनंतर 17520 च्या पातळीवर व्यवहार सुरू होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: