Share Market Updates : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला विक्रीचा सपाटा आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण याचा परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहे. बँकिंग,  आयटी, मेटल्सच्या शेअरमध्ये जोरदार घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास एक टक्क्यांच्या घसरणीसह सुरू झाले. 


आज शेअर बाजारात सेन्सेक्स 554.30 अंकाच्या घसरणीसह 52,623.15 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा 50 शेअरचा निफ्टी निर्देशांक 148.50 अंकांच्या घसरणीसह 15,701 अंकांवर खुला झाला होता. सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स  293 अंकांच्या घसरणीसह 52,885.71 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 92 अंकांच्या घसरणीसह 15,757.50 अंकांवर व्यवहार करत होते. 


निफ्टी 50 मधील सर्व 50 शेअर्समध्ये आज घसरण झाल्याचे दिसून येत आहे. बाजारात चौफेर विक्री सुरू असल्याने शेअर दरात घसरण झाली आहे. निफ्टीत सुरुवातीला 15687 च्या व्यवहार पातळीवर घसरला होता. तर, बँक निफ्टीमध्ये 40.3.20 अंकांची घसरण झाल्याचे दिसून आले.  बँक निफ्टी 1.20 अंकांच्या घसरणीसह  33,239 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. 


इंडसंइंड बँकेच्या शेअर दरात 2.5 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. एचयूएल 2.46 टक्क्यांची घसरण झाली आहे. हिंदाल्कोमध्ये 20.5 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 1.94 टक्के आणि विप्रोमध्ये 1.93 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. 


दरम्यान, मंगळवारी शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये अवघ्या 16 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टी 18 अंकांनी वधारला होता. सेन्सेक्समध्ये 0.03 टक्क्यांची वाढ होऊन तो 53,177 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.11 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,850 अंकांवर पोहोचला. मंगळवापरी 1737 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1460 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. 139 कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज कोणताही बदल झालेला नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


रिलायन्स जिओची धुरा आता आकाश अंबानींच्या हाती, मुकेश अंबानींचा संचालकपदाचा राजीनामा