Share Market Updates : भारतीय ऊर्जा बाजारपेठेतील इंडिया एनर्जी एक्सचेंज ( India Energy Exchange) या कंपनीचे शेअर दर आज वधारले. कंपनीच्या शेअर दरात तब्बल 10 टक्क्यांनी वधारला. कंपनीने बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. या बोनस शेअरसाठी 6 डिसेंबर ही रेकोर्ड डेट ठरवली आहे. त्यामुळे या शेअरचा दर वधारला असल्याचे म्हटले जात आहे. कंपनीने एका शेअरवर दोन शेअर बोनस देण्याची घोषणा केली होती.
कंपनीने 21 ऑक्टोबर 2021 रोजी एक शेअरमागे दोन शेअर बोनस देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. बोनस शेअर मिळवण्यासाठी येत्या 6 डिसेंबरपर्यंत कंपनीचे शेअर तुमच्या डिमॅट खात्यात हवेत. ज्यांच्या डिमॅट खात्यात कंपनीचे शेअर असतील त्यांनाच बोनस शेअर दिले जाणार आहेत.
आज सकाळी शेअर बाजार खुला झाला तेव्हा IEX चा शेअर 10 टक्क्यांपेक्षा अधिक वधारला. या शेअरने सकाळी 279.65 इतका उच्चांकी दर गाठला होता. मात्र, काही वेळानंतर या शेअरमध्ये नफा वसूली सुरू झाली आणि शेअर दर कमी झाला. दुपारी एकवाजेपर्यंत या शेअरचा दर 258 रुपयांच्या घरात पोहचला होता.
शेअर रिसर्च हाऊस युबीएसने या स्टॉकबाबत म्हटले की, या शेअरचा दर सध्या अधिक झाला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नफावसुली होण्याची दाट शक्यता आहे. युबीएसला कंपनीची दीर्घकालीन योजना सकारात्मक वाटते. मात्र, नजीकच्या काळात उत्पन्नाबाबत कंपनीवर दबाव असल्याचे युबीएसने म्हटले. स्टॉकने 19 ऑक्टोबर रोजी 318.72 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला तर 21 डिसेंबर 2020 रोजी 66.35 रुपयांच्या 52 आठवड्यांचा नीचांकी दर गाठला होता
इतर महत्त्वाच्या बातम्या:
सरकार देणार दरमहा 3000 रुपये; नोव्हेंबर महिन्यात 46 लाख जणांनी केली नोंदणी, जाणून घ्या योजना
IPO updates: दस का दम! डिसेंबर महिन्यातही येणार 10 आयपीओ
LIC IPO:तुमच्याजवळ LIC ची पॉलिसी असेल तर IPOमध्ये किती होईल फायदा? पैसे गुंतवावे का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह