Adani Group Stocks मुंबई: गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपसाठी 2024 या वर्ष चढ उताराचं राहिलं. या वर्षाच्या शेवटच्या दिवसात अदानी ग्रुपच्या 11 कंपन्यांपैकी 9 स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. अदानी उद्योग समुहाच्या 11 कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. या पैकी 9 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. बाजार बंद होताना काही कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 7.26 टक्के तेजी पाहायला मिळाली. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर आज 2585 रुपयांवर आहे. वेंचुरा सिक्युरीटीजनं गुंतवणूकदारांना शेअर खरेदीचा सल्ला दिल्यानंतर अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक 7.26 टक्क्यांनी वाढला.
अदानी उद्योगसमुहाच्या कंपन्यांसाठी 2024 चा शेवट चांगला होताना दिसत आहे. मंगळवारी 2024 मधील शेवटचं ट्रेडिंग सेशन होणार आहे. अदानी उद्योग समुहाच्या एकूण 11 पैकी 9 कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळतेय. अदानी एंटरप्रायझेसच्या स्टॉकमध्ये 7.26 टक्के तेजी पाहायला मिळतेय. आज या कंपनीचा शेअर बाजार बंद झाला तेव्हा 2585 रुपयांपर्यंत पोहोचला. आज या कंपनीच्या शेअरमध्ये 175 रुपयांची वाढ झाली आहे. अदानी टोटल गॅसच्या स्टॉकमध्ये 14.99 टक्क्यांची वाढ झाली असून आज बाजार बंद झाला तेव्हा शेअर 781.15 रुपयांवर आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये 101.85 रुपयांनी वाढ झाली आहे.
11 पैकी किती स्टॉक्समध्ये तेजी
अदानी पॉवरच्या शेअरमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. आज अदानी पॉवरच्या शेअरमध्ये 7.16 टक्क्यांची वाढ झाली असून शेअर 543.05 रुपयांवर पोहोचला आहे. आज शेअरच्या दरात 36.30 रुपयांची वाढ झाली आहे.
अदानी एनर्जी सोल्यूशन्सच्या शेअरमध्ये 2.53 टक्के तेजी होती. 20.40 रुपयांनी शेअर वाढून 826.35 रुपयांवर पोहोचला आहे.
अदानी ग्रीन एनर्जी शेअरमध्ये 1.71 टक्क्यांची वाढ झाली असून आज 18 रुपयांची वाढ झाली. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 1072 रुपयांवर आहे.
एसीसी लिमिटेडटच्या शेअरमध्ये 5.70 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. अंबुजा सिमेंटच्या शेअरमध्ये देखील 1.45 रुपयांची घसरण झाली. एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली असून बाजार बंद झाला तेव्हा शेअर 164 रुपयांवर होता. संघी इंडस्ट्रीज आणि अदानी विल्मरच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
21 नोव्हेंबरला अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये मोठी घसरण
2024 हे वर्ष अदानी ग्रुपसाठी चढ उतार असणारं राहिलं आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका न्यायालयात गौतम अदानी यांच्यासह इतर 7 जणांर 2250 कोटींच्या लाचखोरीचे आणि फसवणुकीचे आरोप लावण्यात आले होते. अदानी ग्रुपनं हे आरोप फेटाळले होते. मात्र, त्या दिवसानंतर अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आणि अदानी ग्रीनच्या संचालकांनी अमेरिकेतली न्याय विभाग आणि अमेरिका सिक्युरीटीज अँड एक्सचेंज कमिशनचे लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप फेटाळले होते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
इतर बातम्या :