मुंबई : भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दिवसभरात शेअर बाजारात तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला होता. मात्र, अखेरच्या तासात शेअर बाजार सावरल्यानं सेन्सेक्समध्ये बाजार बंद होताना 102.20 अंकांची घसरण दिसून आली. सेन्सेक्स आज 84961.14 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी 37.95 अंकांनी कमी होऊन 26140.75 वर बंद झाला.
Share Market Update : शेअर बाजारात घसरण
शेअर बाजारातील घसरण भू राजनैतिक तणाव आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून सातत्यानं विक्री सुरु असल्यानं बाजारावर परिणाम दिसून आला. याशिवाय आशियाई बाजारातून कमजोर संकेत मिळत असल्यानं त्याचा देखील परिणाम झाला.बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप 0.47 अंकांच्या तेजीसह बंद झाले. आयटी, फार्मा इंडेक्स, कंझ्युमर ड्युरेबल्सच्या शेअरमध्ये 1.8 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. दुसरीकडे ऑईल अँड गॅस, रिअल्टी आणि टेलिकॉम निर्देशांकात घसरण दिसून आली.
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं बाजारमूल्य 479.85 लाख कोटींवर पोहोचलं आहे. मंगळवारी या कंपन्यांचं बाजारमूल्य 479.60 लाख कोटी होतं. म्हणजेच एका दिवसात 25000 कोटी रुपयांनी बाजारमूल्य वाढलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांची संपत्ती एका दिवसात 25 हजार कोटी रुपपयांनी वाढली आहे.
बीएसई सेन्सेक्सवरील 30 पैकी 12 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. टायटनच्या शेअरमध्ये 2.87 टक्के तेजी पाहायला मिळाली. एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, सन फार्माच्या शेअरमध्ये 1.28 टक्के ते 1.75 टक्के तेजी पाहायला मिळाली.
सेन्सेक्सवर बुधवारी 18 शेअर घसरणीसह बंद झाले. मारुती सुझुकी, पॉवर ग्रीड, एचडीएफसी बँक, एशियन पेंटस, टाटा स्टीलच्या शेअरमध्ये घसरण झाली. मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये 8.62 टक्क्यांनी घसरण झाली.
बीएसईवरील 4350 शेअर पैकी 2108 शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. तर,2066 शेअरमध्ये घसरण झाली आहे. 176 शेअरमध्ये तेजी किंवा घसरण झाली नाही. तर, 140 शेअरनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)