Ankita Walavalkar On Mandar Devsthali: मराठी मनोरंजन विश्वातला प्रसिद्ध मराठी अभिनेता (Marathi Actor) शशांक केतकरनं (Shashank Ketkar) नुकताच सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर करुन प्रसिद्ध दिग्दर्शक (Marathi Director) आणि निर्माते मंदार देवस्थळीवर गंभीर आरोप केले. फसवणूक केली, पैसे थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो..., असे अनेक आरोप शशांक केतकरनं केले आहेत. शशांकनं व्हिडीओ शेअर केल्यानंतर इतरही अनेक कलाकारांनी मंदार देवस्थळींवर (Mandar Devasthali) आरोप केलेत. त्यामध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकरनं (Ankita Walavalkar) शशांक केतकरच्या व्हिडीओवर कमेंट करुन शशांकला विचारलेल्या प्रश्नामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि बिग बॉस मराठी 5 ची स्पर्धक कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच, अंकिता वालावालकर हिनं शशांकच्या व्हिडीओवर केलेली कमेंट सध्या चर्चेत आहे. अंकिताच्या नवऱ्याची देखील अशीच फसवणूक झाल्याचं तिनं सांगितलं आहे. शशांकच्या व्हिडीओवर अंकितानं कमेंट करत तिचा नवरा कुणाल भगत याला टॅग केलं आहे. तिनं लिहिलंय की, "कुणाल तुझे पैसे ज्यांनं डुबवलेत त्याचं नाव लिहू का रे मी इथे?" अंकिताची ही कमेंट चर्चेत आली आहे. तिच्या कमेंटवर अनेकांनी रिप्लाय देत, अनेकांनी तिला बिनधास्त नावं लिही, असंही म्हटलं आहे.
अंकिता वालावलकरचा नवरा कुणाल भगत प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहे. त्यानं अनेक गाणी, चित्रपट आणि टीव्ही मालिकांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. कदाचित शशांक केतकरप्रमाणेच मंदार देवस्थळींनी कुणाल भगतचेही पैसे बुडवलेत, म्हणूनच अंकिता वालावलकरनं अशी पोस्ट केलीय, असं बोललं जात आहे.
दरम्यान, शशांक केतकरनं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करुन एका मालिकेच्या निर्मात्याकडून मानधन थकवण्याचा आरोप केलेला. तसेच, शशांकनं पोस्ट करुन त्या निर्मात्याला इशाराही दिलेला. पण, पोस्टमध्ये शशांकनं कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. त्यानंतर आता शशांकनं त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट करुन निर्मात्याचं नाव घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच, निर्मात्यासोबत झालेल्या संभाषणाचे काही स्क्रिनशॉर्ट्सही शेअर केले आहेत. शशांकनं व्हिडीओ पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :