मुंबई: भारतीय शेअर बाजारात 23 जुलै रोजी तेजी पाहायला मिळाली होती. गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास 2 लाख कोटींनी वाढली होती. मात्र, भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार जाहीर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसऱण पाहायला मिळाली. भारतीय कंपन्यांचे पहिल्या तिमाहीतील कमजोर निकाल आणि विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळं सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. सेन्सेक्स 542.47 अंकांनी घसरुन 82184.17 अंकांवर आला. तर निफ्टी 50 मध्ये देखील 157.80 अकांची घसरण होऊ तो 25062.10 अंकांवर बंद झाला.
निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकात 1.2 टक्क्यांची वाढ झाली तर निफ्टी फार्मामध्ये 0.6 टक्क्यांची तेजी पाहायला मिळली. निफ्टी आयटीमध्ये मोठी घसरण झाली. निफ्टी रिअल्टी आणि निफ्टी एफएमसीजी, निफ्टी एनर्जी, इन्फ्रा आणि मीडियामध्ये घसरण पाहायला मिळाली.
आयटी शेअरमध्ये सर्वाधिक विक्री झाल्याचं पाहायला मिळाली. पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेड आणि कोफोर्ज लिमिटेडच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली. यामुळं निर्देशांक 12- अंकांनी घसरला. इन्फोसिसच्या स्टॉकमध्ये 1 टक्क्यांची घसरण झाली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 2.26 लाख कोटींनी घटलं. बीएसईचं सेन्सेक्सचं बाजारमूल्य 458.09 लाख कोटींवर आलं. काल सेन्सेक्सचं बाजारमूल्य 1.98 लाख कोटींनी वाढलं होतं. मात्र, दुसऱ्याच दिवशी 2.26 लाख कोटींनी बाजारमूल्य घटलं आहे.
सेन्सेक्सवरील टॉप 30 पैकी 6 कंपन्यांच्या स्टॉकमध्ये वाढ झाली. तर, 24 स्टॉकमध्ये घसरण झाली. ट्रेंट, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक्नोलॉजी, बजाज फिनसर्व्हच्या स्टॉकमध्ये वाढ झाली. तर, हिंदुस्तान यूनिलीवर, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, टायटनच्या स्टॉकमध्ये घसरण झाली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील एकूण 4221 स्टॉक पैकी 2408 स्टॉकमध्ये घसरण झाली. तरस 1646 स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. 167 स्टॉकमध्ये तेजी किंवा घसरण आली नाही.
दरम्यान, भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर शेअर बाजाराची प्रतिक्रिया कशी येते ते देखील उद्या लक्षात येईल. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत संभ्रमाचं वातावरण असल्यानं विदेशी गुंतवणूकदारांकडून गेल्या काही दिवसांपासून विक्रीचं सत्र कायम ठेवलं गेल्याचं पाहायला मिळतंय.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)