Share Market Opening Bell : आज शेअर बाजारात (Stock Market) सुरुवातीच्या सत्रात घसरण झाली आहे. बाजारात जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स (Sensex) 220 अंकांनी घसरला असून निफ्टी (Nifty 50) 17400 च्या खाली गडगडला आहे. आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण दिसत आहे. शेअर बाजारात आयटी सेक्टरची परिस्थिती बिकट आहे. विक्री होणाऱ्या शेअर्समध्ये आयटी शेअर्स आघाडीवर आहेत. जागतिक बाजारातील संथ व्यवहारांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसत आहे. 


Share Market Opening : शेअर बाजारात विक्रीचा दबाव


भारतीय शेअर बाजार गडगडल्याचं चित्र दिसत असून हा जागतिक बाजाराचा परिणाम आहे. सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांनी घसरून 59400 वर व्यवहार करत आहे. तसेच निफ्टीमध्येही घसरण झाली असून निफ्टी 17400 वर व्यवहार करत आहे. आज शेअर बाजारात आयटी आणि ऑटो सेक्टर तोट्यात असल्याचं दिसत आहे. आयटी आणि ऑटो शेअर्सवर दबाव दिसून येत आहे. 


Share Market Opening : प्री- ओपनिंगमध्ये बाजारात घसरण


प्री- ओपनिंगमध्ये बाजाराने घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्स 28.91 अंकांनी म्हणजेच 0.05 टक्क्यांनी घसरून 59382.17 च्या वर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, निफ्टी 18.50 म्हणजेच 0.14 टक्क्यांच्या घसरणीसह 17427.30 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.


'हे' शेअर्स तेजीत?


आज शेअर बाजारात बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv), बजाज फायनान्स (Bajaj Finance), टाटा स्टील (TATA Steel), अल्ट्राट्रेक सिमेंट, रिलायन्स (Reliance), एल अँड टी (L&T), एचडीएफसी बँक (HDFC Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.


कोणते शेअर्स घसरले?


शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात एशियन पेंट्स (Asian Paints), आयटीसी (ITC), टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, अनटीपीसी, सन फार्मा, भारतीय स्टेट बँक (SBI), टीसीएस (TCS), एम अँड एम (M&M), भारती एअरटेल (Airtel), नेस्ले (Nestle), टाटा मोटर्स, मारुती, विप्रो, पावरग्रीड हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.


Share Market Opening : शेअर बाजारातील परिस्थिती काय?


आयटी आणि ऑटो शेअर्सवर विक्रीचा दबाव आहे. टीसीएस (TCS), अदानी इंटरप्राईजेस (ADANI ENT), इन्फोसिस (INFOSYS) आणि M&M हे निफ्टीच्या टॉप लूजर्समध्ये आघाडीवर आहेत. तर बजाज फिनसर्व्हने तीन टक्क्यांनी उसळी घेतली आहे. यापूर्वी 1 मार्चला म्हणजेच बुधवारी आठ दिवसांनंतर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स 449 आणि निफ्टी 147 अंकांनी वाढून बंद झाला.


Share Market Opening : गुंतवणूकदारांची 3.21 लाख कोटींची कमाई


1 मार्चला, BSE वर सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल रोजी 260.93 लाख कोटी रुपये झाले. हे मंगळवार (28 फेब्रुवारी) पेक्षा 257.72 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप बुधवारी सुमारे 3.21 लाख कोटी रुपयांनी वाढलं. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.21 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


LPG Price Hike: होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा चटका... LPG सिलेंडर 50 रुपयांनी, तर कमर्शियल सिलेंडर 350 रुपयांनी महागला