Share Market Updates : आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक शेअर बाजारातून नकारात्मक संकेत मिळू लागल्याने भारतीय शेअर बाजारातही त्याचा परिणाम दिसून आला. निफ्टी 17800 अंकांखाली सुरू झाला. तर, सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण दिसून आली. सेन्सेक्स 59,309.42 अंकांवर सुरू झाला. निफ्टी 50 निर्देशांकातही 73.70 अंकांची घसरण दिसून आली. शेअर बाजारात नफा वसुली दिसून येत असल्याने ही घसरण होत असल्याचे म्हटले जात आहे.

  


निफ्टी 50 मधील 23 शेअर्स आज वधारले आहेत. तर, 27 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टीतही 140.50 अंकांची घसरण दिसून आली असून 37492 अंकांवर व्यवहार करत आहे. 


क्षेत्रांनुसार, मीडिया शेअरमध्ये 1.20 टक्क्यांनी वधारले आहेत. तर, हेल्थकेअर क्षेत्र 1.46 टक्क्यांनी वधारला आहे. रिअल्टीमध्ये 1.04 टक्क्यांनी वधारले आहेत. तर, आयटी क्षेत्राच्या निर्देशांकात 1.01 टक्क्यांची घसरण दिसत आहे. 


 


सिप्ला कंपनीचे शेअर 1.70 टक्क्यांनी वधारले आहेत. तर, एनटीपीसीमध्ये 1.47 टक्क्यांनी वधारले आहेत. डॉ. रेड्डीज लॅबमध्ये 1.18 टक्क्यांची उसळण दिसून येत आहे. त्याशिवाय अदानी पोर्ट्समध्ये 1.04 टक्क्यांनी वधारला आहे. डीव्हीजी लॅबमध्ये 0.91 टक्क्यांनी वधारला आहे.







बुधवारी शेअर बाजाराची काय स्थिती?


जागतिक स्तरावरील घडामोडी आणि ऑटो, बँक आणि आयटी क्षेत्रात झालेल्या विक्रीमुळे बुधवारी शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं. गुरुवारी, शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 566 अंकांनी घसरला आहे. तर, निफ्टीही 149 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.94 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,610 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.83 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,807 वर पोहोचला आहे. बुधवारी शेअर बाजारात नफा वसुली दिसून आली होती. त्यामुळे बाजारात घसरण झाली. 


बुधवारी 2094 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1229 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 92 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता.