Share Market Predication: आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी भारतीय शेअर बाजारात (Share Market) तेजी दिसून आली. मागील आठवड्यात चार दिवस बाजारात घसरण दिसून आली होती. त्यानंतर काल (26 डिसेंबर रोजी) बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. सेन्सेक्स निर्देशांकाने (BSE Sensex) 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. तर, निफ्टीने (NSE Nifty)18 हजार अंकांचा टप्पा ओलांडण्यास यश मिळवले.


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 704 अंकांची तेजी दिसून आली. सेन्सेक्स 60,555 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 200 अंकांच्या तेजीसह 18006 अंकांवर स्थिरावला. त्यामुळे आज बाजार कसा व्यवहार करेल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे. 


या कंपन्यांच्या शेअर्सवर ठेवा नजर 


एनटीपीसी, टाइम टेक्नोप्लास्ट, जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स आणि शेअर इंडिया सिक्युरिटीजच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येऊ शकते. देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी NTPC ने इटलीच्या Maire Tecnimont समूहातील भारतीय कंपनी Tecnimont सोबत सामंजस्य करार केला आहे. ते भारतात ग्रीन मिथेनॉल निर्मितीबाबत संयुक्तपणे काम करणार आहेत. टाईम टेक्नोप्लास्टला अदानी टोटल गॅसकडून (Adani Total Gas) 75 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.


जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्सला मध्य प्रदेशातील एक्सप्रेस वे कॅरेजवेसाठी पूर्णत्व प्रमाणपत्र मिळाले आहे. हा प्रकल्प भारतमाला प्रकल्पाचा एक भाग आहे. त्याच्या कंत्राटाची किंमत 991 कोटी रुपये होती. शेअर इंडिया सिक्युरिटीजच्या बोर्डाने राइट इश्यूद्वारे 1000 कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनीने यासाठी कॉर्पोरेट प्रोफेशनल्स कॅपिटलला लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करणार आहे.


या शेअर्समध्ये दिसू शकतो चढ-उतार


मोमेंटम इंडिकेटर MACD नुसार, Granules India, Suven Life Sciences, Intellect Design, Brigade Enterprises आणि Shyam Metallics या कंपन्यांच्या शेअर दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 


तर, UCO Bank, बजाज हिंदुस्थान (Bajaj Hindusthan), शक्ती शुगर्स (Shakti Sugars) आणि बलरामपूर चिनी (Balarampur Chini) या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण होण्याची शक्यता आहे. 


MACD इंडिकेटर काय आहे?


Moving Average Convergence/Divergence  (MACD) हे ट्रेंड रिव्हर्सलसाठी ओळखले जाते. MACD इंडिकेटरमध्ये सिग्नल लाइन ओलांडली की त्या शेअरमध्ये तेजी राहण्याचे संकेत समजले जातात. या MACD नुसार स्टॉकमधील संभाव्य तेजी आणि घसरण याचाही अंदाज लावता येतो. त्याआधारे संबंधित शेअर्समध्ये तेजी अथवा घसरण होणार याचा अंदाज लावता येतो. 


(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.) 


इतर महत्त्वाच्या बातम्या: