Share Market Opening Bell : आज शेअर बाजारात (Stock Market) संमिश्र सुरुवात पाहायला मिळाली आहे. जागतिक शेअर बाजाराचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसत आहे. अमेरिकन बाजारातील पडझडीमुळे भारतीय बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्सची किंचित घसरण झालू असून निफ्टी किचिंत वाढीसह व्यवहार करत असल्याचं चित्र आहे. सोमवारी (13 मार्च) शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला होता. जागतिक बँकिंग संकटाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसत आहे. 


शेअर बाजारातील सुरुवातीची परिस्थिती


आज बाजार सुरु होताच बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 69.10 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरुन 58,168.75 वर उघडला. तर एनएसईचा निफ्टी निर्देशाक 6.25 अंकांनी वाढून 17,160.55 वर उघडला. आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये घसरण झाली असून निफ्टी तेजीत आहे.


सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती काय?


सेन्सेक्समधील 30 पैकी 9 शेअर्स तेजीत आहेत आणि 21 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी फक्त 19 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे आणि 30 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. एक स्टॉक सामान्य स्थितीत कायम आहे.


सेक्टरमधील परिस्थिती


आज बाजारात FMCG, मीडिया, फार्मा आणि हेल्थकेअर हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या लाल चिन्हासह व्यापार करत आहेत. आज रियल्टी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.


प्री-ओपनिंगमध्ये काय होती स्थिती?


प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स-निफ्टीमध्ये संमिश्र व्यवहार पाहायला मिळाला. बीएसई सेन्सेक्स 69.45 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांच्या घसरणीनंतर 58168 च्या वर होता. तर NSE चा निफ्टी 5.75 अंकांच्या किंचित वाढीनंतर 17160.05 च्या वर होता.


कोणते शेअर्स तेजीत?


अपोलो हॉस्पिटल, अदानी पोर्ट, अदानी इंटरप्रायजेस, एशियन पेंट्स, भारती एअरटेल हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.


कोणते शेअर्स घसरले?


बजाज फायनान्स, सिपला, ब्रिटॅनिया, कोल इंडिया, एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Income Tax : आयकर वाचवायचा आहे? तर लवकरात लवकर करा 'ही' कामं